Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करून तीन आठवड्याहून अधिक कालावधी लोटला आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून (Mahayuti Seat Sharing) अद्याप नाशिकला उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच आता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
एकीकडे नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे शांतीगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. शांतीगिरी महाराजांच्या वतीने नाशिक शहरातील आडगावपासून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी सुमारे एक हजाराहून अधिक बाईक घेऊन त्यांचा भक्त परिवार बाईक रॅलीत सहभागी झाला. प्रचार करण्यासोबतच मतदानाचा हक्क बजवा, असे आवाहनही मतदारांना करण्यात आले.
महायुतीने माझा विचार केल्यास विजय नक्की होणार
बाईक रॅलीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराजांनी महायुतीने माझा विचार केल्यास माझा विजय नक्की होणार, असे वक्तव्य केले आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीतून नाशिक लोकसभेची (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटदेखील घेतली होती. मात्र त्यांचे नाव पुढे येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महायुती नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना शांतीगिरी महाराजांनी पुन्हा एकदा महायुतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम
दरम्यान, महायुतीत नाशिकच्या जागेवर विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेतून माघार घेतली. त्यानंतर देखील महायुतीकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार देण्यात आला नाही. छगन भुजबळांच्या माघारीनंतर हेमंत गोडसे आशा पल्लवित झालेल्या असतानाच शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनीदेखील लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविल्याने नाशिक लोकसभेवर नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आता लढायचं आणि जिंकायचं! आठ दिवसांचे अनुष्ठान करत शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या रिंगणात