Nashik lok Sabha Constituency : नाशिक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) आज लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध करत आपले नाशिक विषयीचे व्हिजन मांडले. नाशिक म्हटलं की पहिले नाम समोर येते ते म्हणजे जय श्रीरामाचे. कुशल प्रशासक श्रीरामांना वंदन करून आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
यावेळी शांतीगिरी महाराज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, नाशिकमध्ये भगवं वादळ आले आहे. निवडणुकीत वचननामा सादर करत आहे. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा आमचा नारा आहे. जे बोलणार ते करणार, जे करणार तेच बोलणार असा आमचा संकल्प आहे. आम्हाला खात्री आहे की, राजकारणाच्या माध्यमातून जनतेचे ऋण आम्ही फेडणार आहोत.
खासदार भवन उभारणार
हा फक्त माझा नाही, संपूर्ण जय बाबाजी भक्त परिवाराचा वचननामा आहे. संसद भवन जसे आहे तसे खासदार भवन करणार आहोत. त्यात सगळे कक्ष असतील. जी समस्या तिथं येईल ती आम्ही सोडवू. आम्ही काही गोष्टी न बोलता करून दाखवू. आगळं वेगळं काम आम्ही करून दाखवू. गोदावरी नदी स्वच्छ करणार, स्नान करता आलं पाहिजे अशी गोदावरी नदी करणार आहोत. अयोध्येत जसे राम मंदिर झाले, त्यासाठी संन्यासी योगी आदित्यनाथ यांना विराजमान व्हावे लागले. जे प्रयत्न करीत होते त्यांना गोळ्या घालाव्या लागल्या, पण नंतर कुठलाही वाद न करता वाद सोडविला.
अंजनेरी गड येथे हनुमान जन्मभूमी साकारणार
आपल्या नाशिकमध्ये अंजनेरी गड येथे हनुमान जन्मभूमी साकारणार आहोत. अयोध्येप्रमाणे आम्ही विकास करणार आहोत. बेरोजगारी, सेंद्रिय खतांचा कारखाना उभारणार आहोत. नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन करणार आहोत. मेट्रो करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. पुणे, मुंबई या शहरांना जोडण्यासाठी भर असेल. आयटी पार्कसाठी प्रयत्न केले. पण, पूर्ण होऊ शकले नाही ते आम्ही पूर्ण करणार आहोत.
कुंभमेळ्यासाठी चोख नियोजन करणार
गुरुकुल पद्धतीचे शिक्षण सुरू केले जाईल, पैसे कमावण्याचा त्यात हेतू नाही. संस्कार त्या गुरुकुलमध्ये दिले जाईल. कुंभमेळ्यासाठी आम्ही चोख पद्धतीने नियोजन करू. नाशिक-पुणे रेल्वे सेवा सुरु करू. आमच्या गुरूंनी दिलेला उपदेश आहे. बोलून दाखवणार नाही करून दाखवणार आहोत.
आमचं ठरलंय लढणार आणि जिंकणार
कुणाच्या नावाचा उल्लेख करणार नाही. जसे कर्म तसे फळ मिळणार आहे. कोणतेही काम चांगलं, टिकणारे काम झाले पाहिजे, टक्केवारी घेणार नाही. मोदींनी 10 वर्षात चांगलं काम केले आहे. आम्ही निवडून आलो तर कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. आमचं ठरलंय लढणार आणि जिंकणार, असेही त्यांनी म्हटले आहे.
खासदार झाल्यावर पगार घेणार नाही
शांतीगिरी महाराज खासदार झाल्यावर पगार घेणार नाहीत. तो पगार जनसेवेसाठी वापरतील. आमच्याकडे कोणत्याही टक्केवारीला थारा नाही राहणार. 20 लाख आम्हाला निधी आला तर त्यात आणखी आम्ही 11 हजार निधी भक्तांकडून घेऊन टाकू, अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे
शेतकरी प्रथम प्राधान्य : मतदारसंघात शेतकरी विकास केंद्र उभारणार, मालाला हमीभाव, 24 तास वीज आणि पाणी सुविधा देणार.
नागरी सुविधा : अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील 25 वर्षांचा विचार करून आराखडा, वाहतूक कोंडी सोडवणार
उद्योग : नाशिकच्या तरुणांना शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, आयटी पार्कचा पाठपुरावा करू, स्टार्ट अपसाठी प्रयत्न करणार
कनेक्टिव्हिटी : शिक्षण, योग आणि संस्कृत विद्यापीठ उभारणार, तीर्थक्षेत्र विकास करणार, अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, आदर्श कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न.
आणखी वाचा