Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शांतीगिरी महाराजांचा नाशिक, धुळे, दिंडोरी, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, जळगाव, जालना या मतदारसंघांमध्ये मोठा भक्तपरिवार आहे. शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) या मतदारसंघात कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता शांतीगिरी महाराजांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


शांतीगिरी महाराज म्हणाले की, पाप आणि पुण्य हे समजतं. कुणाचं नाव घेऊन सांगण्याची गरज नाही.  एकाला मतदान करा, बाबांचा विचाराशी विचार जुळतात त्यांना मतदान करा.  13 मे ला मतदान करा, संभाजीनगर, जालना, शिर्डी आणि जळगाव इथं मतदान करा,  जय बाबाजी भक्त परिवार योग्य निर्णय घेईल, अशी भूमिका शांतीगिरी महाराजांनी स्पष्ट केली. 


उद्या जाहीरनामा प्रसिद्ध करणार


ते पुढे म्हणाले की, आमच्या परिवारात सगळ्या समाजाचे लोक आहेत, कुणीही नाराज नाही, बाबा कोणत्याही समाजाचे बांधलेले नाही. अमावस्याच्या पर्व कालात आम्ही काहीही जाहीर करत नाही. संभाजीनगरला आमचा कुणालाही पाठिंबा नाही. उद्या 12 वाजता जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, आज सर्व सांगणार नाही, पण करून दाखवणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.


शांतीगिरी महाराजांचा हेमंत गोडसेंना टोला 


सिन्नर येथे प्रचारावेळी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे आमनेसामने आले होते. यावेळी शांतीगिरी महाराजांनी हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना त्यांची निशाणी बादली भेट दिली होती. यावर विचारले असता शांतीगिरी महाराज म्हणाले की,  बादली आणि नारळ हेमंत गोडसे यांना दिलं आहे. बादलीला मतदान करा आणि नारळ घरी राहण्यासाठी दिले आहे, असा टोला त्यांनी यावेळी हेमंत गोडसेंना लगावला आहे. 


20 तारखेला भगवं वादळ येणार


माझ्याकडे ज्या जमिनी आहेत, त्या लोकांनी दान केल्या आहेत. राजकारणात शत्रू आणि मित्र नसतो. आमचं कर्तव्य आहे. करण गायकर यांना बादली भरून प्रसाद देऊ,  जनतेने ठरवल आहे की, 10 लाखांचं लीड मिळेल. दिनकर पाटील यांच्यासोबत आमची मैत्री आहे, त्यांना आम्ही भेटलो.  20 तारखेला भगवं वादळ येणार, असेही शांतीगिरी महाराज म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shantigiri Maharaj : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज भुजबळांच्या भेटीला, भाजप नेत्याशीही बंद दाराआड खलबतं, चर्चांना उधाण


Shantigiri Maharaj : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांना मिळालं 'बादली' चिन्ह, नाशिक लोकसभेत देणार टफ फाईट