एक्स्प्लोर

Sanjay Shirsat On Prithviraj Chavan : आतापर्यंत तुम्ही गोट्या खेळत होता का? संजय शिरसाट यांचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

Sanjay Shirsat : शिंदे सरकारच्या धास्तीमुळे हे पोपट आता बोलायला लागले असल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहेत. 

नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून सरकारवर टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात आमचे सरकार असते तर आत्तापर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला असता, असे चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना, "आतापर्यंत तुम्ही गोट्या खेळत होता का?," असा खोचक टोला शिरसाट यांनी चव्हाणांना लगावला आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेली 40 वर्षे मराठा समाज भांडत आहे. तेव्हा तुम्ही झोपले होते का? मुख्यमंत्री होते ना? आतापर्यंत तुम्ही गोट्या खेळत होते का? असे शिरसाट म्हणाले. तर, लखवा मारलेले मुख्यमंत्री असं शरद पवार तुम्हाला म्हणायचे, तुम्ही काय शिकवतायत. शिंदे सरकारच्या धास्तीमुळे हे पोपट आता बोलायला लागले असल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहेत. 

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

"मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर त्यावेळी आमचं सरकार पडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं. मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं, तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि 2014 मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल...

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देखील संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. "अडीच वर्षात घरात बसणारे आज मुख्यमंत्र्यांची लाज काढतायत हे दुर्दैव, हा मोठा विनोद आहे. अवकाळी पाऊस येणार म्हणजे छत्री धरायची होती का? , यांना शेतीतील काही कळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक मंत्री आज बांधावर आहेत. एक दिवस आमचे मंत्री प्रचाराला गेले तर यांना त्रास होतो आणि हे अडीच वर्षात घरात बसले होते. यांना ना शेतकऱ्याचा कळवळा, ना आरक्षणाच्या प्रश्नावर घेणं देणं आहे. फक्त टोमणे मारणे हा तुमचा स्वभाव झाला आहे.  मुख्यमंत्र्यांचा आदर करायला शिका, काम न करता लोकं आपल्या पाठीशी आहेत हे त्यांचं स्वप्न भंग होणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभेत त्यांची जागा पहायला मिळेल, असेही शिरसाट म्हणाले. 

राज्यातील आमचं सरकार व्हीसीवर नाही, शेतात आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती आहे की, सरकार आमच्या पाठीशी आहेत. आम्हाला आमच्या राज्याचा लावलौकीक देशात वाढवायचा आहे. चौकट तोडून आम्ही काय करू शकतो हे देशाने बघितले. पण, तुम्ही जे राज्य चालवले हे जनतेने बघितले आहे, असेही शिरसाट म्हणाले. 

भुजबळांवर निशाणा...

मराठा कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधण्यासाठी सरकराने गठीत केलेली शिंदे समिती तत्काळ रद्द करण्याची मागणी ओबीसी नेते तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यावरून शिरसाट यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे समितीबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे. त्याची अमलबजावणी शिंदे समिती करते आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करायची की नाही हे कॅबिनेट ठरवेल, मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यामुळे  त्यांच्यासमोर मागणी करायची ना?, असा टोला शिरसाट यांनी भुजबळांना लगावला आहे. 

प्रकाश आंबेडकरांच्या दंगल वक्तव्यावर प्रतिक्रिया 

वाद पेटू नये या भूमीकेत सरकार आहे. जाती-जातीत भांडण होऊ नये या भूमिकेत सरकार काम करते आहे. सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. कोणत्याही समजाचे घटक दंगल करणाच्या प्रयत्न करणारे असतील, तर त्यांना रोखल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणीही असेल, असेही शिरसाट म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Prithviraj Chavan on NCP : राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं : पृथ्वीराज चव्हाण

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget