Nashik News: संभाजी भिडे गुरुजी आज नाशिकला; अंजनेरी भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम
Sambhaji Bhide Guruji Nashik Tour: संभाजी भिडे गुरुजी आज नाशिक दौऱ्यावर असून आज अंजनेरीत भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम असणार आहे.
Sambhaji Bhide Guruji Nashik Tour: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide Guruji) आज नाशिकमध्ये (Nashik News) येणार आहेत. श्री शिवप्रतिष्ठानतर्फे आज दुपारी अंजनेरी येथे भिडे गुरुजींच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज गडकोट मोहीम आणि रायगडावरील 32 मन सुवर्ण सिंहासन स्थापनेसाठी भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केलेलं आहे. हे व्याख्यान आज दुपारी 3 वाजता नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गावातील हनुमान मंदिर पटांगणात होणार आहे.
संभाजी भिडे गुरुजी हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते शिवप्रतिष्ठान संस्थेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे आणि उपक्रमांमुळे चर्चेत असतात. आतापर्यंत अनेक वादातही ते अडकले असून अनेक तक्रारी देखील दाखल आहेत. दरम्यान किल्ले रायगडावरील राजदरबारात 32 मण सोन्याचं सिंहासन बसविण्याचा संकल्प संभाजी भिडे गुरूजी यांनी केल्यानंतर ते राज्यातील विविध भागात जाऊन व्याख्यान देत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये येत असून शिवप्रतिष्ठान नाशिक संस्थेच्या माध्यमातून व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
भिडे गुरूजी काय बोलणार?
शिवप्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात संभाजी भिडे गुरुजी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी अंजनेरी हनुमान जन्मस्थळावरून मोठा वाद झाला होता. किष्किंधा नगरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे एका महंतांनी सांगितल्यावरून हा वाद धर्मसभेपर्यंत पोहचला होता. त्याच ठिकाणी भिडे गुरुजी हे बोलणार असल्याने त्यांच्या व्याख्यानाकडे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बिऱ्हाड आंदोलन होणारच, राजू शेट्टींचा इशारा; तर दादा भुसे म्हणाले, लवकरच तोडगा काढू