Raosaheb Danve नाशिक : आगामी लोकसभेची (Lok Sabha Elections 2024) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. अलीकडेच भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी लोकसभा निवडणुकीवरून नाशिकमध्ये 'चिट्ठी बॉम्ब' टाकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


काही दिवसांपूर्वीच भाजपने आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या (Maharashtra Politics) उमेदवारांचा समावेश नसल्याने विरोधकांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना नाशिकमध्ये रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 


रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये 'चिट्ठी बॉम्ब'


रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे. धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या मतसंघाचा दानवेंनी उल्लेख केला आहे. थोड्याच वेळात याबाबत डिटेलमध्ये बोलतो, असं म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.  एकीकडे जागावाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवेंनी नाशिकमध्ये (Nashik News) दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


बीडची उमेदवारी कोणाला? रावसाहेब दानवे म्हणाले...


भाजपच्या बीड (Beed) येथील लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections 2024) उमेदवारीबाबत संभ्रम आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) की प्रीतम मुंडे असा प्रश्न कायम असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यात भर टाकली आहे. खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde), डॉक्टर भागवत कराड (Dr Bhagwat Karad) आणि माझी देखील उमेदवारी नक्की नाही, भाजपात पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो, असे सांगून उमेदवारी बाबतचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला आहे. तसेच आम्ही तिघेही उमेदवार असल्याचे देखील रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chitra Wagh : शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वच कुचकामी ठरले, बारामतीच्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडलं; काय म्हणाल्या चित्रा वाघ?


महायुतीच्या जागावाटपावरून छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "आमचे उमेदवार मोदी लाटेविरोधात लढलेत, त्यामुळे..."