Chhagan Bhujbal नाशिक : अद्याप जागा वाटपावर निर्णय झालेला नाही. 2019 साली भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी मोदी लाट होती. आमचे उमेदवार प्रवाहाच्या विरोधात लढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. नाशिक (Nashik) येथे पत्रकरांशी संवाद साधताना छगन भुजबळ बोलत होते. 


छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रया दिली आहे. अद्याप जागा वाटपावर निर्णय झाले नाही. शिंदे गट आणि आमचे तेवढेच आमदार आहेत. 2019 साली भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते, त्यावेळी मोदी लाट होती. त्या लाटेत निवडून आलेत, आमचे उमेदवार प्रवाहाच्या विरोधात लढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे. एकमेकांना समजून घेऊन जागा वाटप झाले पाहिजे. जे उमेदवार निवडून येतील त्यांना त्या जागा मिळाल्या पाहिजेत. विभागानुसार प्रतिनिधित्व असावे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) जागेवर छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकची जागा आम्हाला मिळाली तर कोण लढवेल हे पक्ष ठरवेल. आम्ही किती काम केले आहे हे लोकांना माहिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


चुकीचे काम झाले तर सरकार बदनाम होईल


नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) मोठा भ्रष्टाचार (Corruption) सुरू असल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. यावर विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, कांदे विरुद्ध भुजबळ असे वाद नाही. आम्ही सगळे एकाच पक्षात काम करतोय. आरक्षित भूखंड यांना धक्का लावू नये ही माझी भूमिका आहे.  मी आयुक्तांना देखील सांगितले यावर योग्य तो निर्णय घ्यावा. उद्या अडचणीत सापडले तर कोणीच येणार नाही. चुकीचे काम झाले तर सरकार बदनाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


भुजबळांचा शरद पवारांना टोला 


पुण्यातील लवासा प्रकल्पातील कथित अनियमिततेप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, बरोबर आहे. यंत्रणेकडून काही झालं तर कोर्टात जाता येते.  त्याचा फायदा लोक घेतात, असे त्यांनी म्हटले आहे. 


ठाकरे गटाच्या सुनावणीवर काय म्हणाले भुजबळ? 


शिवसेना पक्ष फुटल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटालाच खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केले होते. नार्वेकर यांच्या या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी होत आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, मी वकील किंवा न्यायाधीश नाही.  त्यामुळे जे होईल ते पाहत राहायचे. 


भुजबळांकडून मनसेला शुभेच्छा 


मनसेचा 18 वा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होत आहे. यानिमित्त मनसेकडून जोरदार तयारी केली जात आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे आज सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. याबाबत भुजबळ म्हणाले की, लोकशाही आहे. पक्ष वाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो.  त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत.  


आपल्या मागणीसाठी काहीतरी अडथळा करणे हे योग्य नाही


मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज जर जास्त आले तर EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एवढे उमेदवार उभे केले तर तेवढे वकील पाहिजे. डिपॉझिट भरण्यासाठी कोटी रुपये लागतील. हे कितपत शक्य आहे मला माहिती नाही. आपल्या मागणीसाठी काहीतरी अडथळा करणे हे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Raj Thackeray : राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीची 'राज'गर्जना करणार!