Raj Thackeray नाशिक : मनसेचा 18 वा वर्धापनदिन (MNS Vardhapan Din) नाशिकमध्ये साजरा होणार आहे. यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) नाशिकमध्ये येणार असल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज ठाकरेंचे बॅनर फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मनसेच्या वर्धापनदिननिमित्त नाशिक शहरात मनसेकडून अनेक बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र नाशिकच्या काळाराम मंदिर (Kalaram Mandir) परिसरात लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काळाराम मंदिर परिसरातील बॅनर फाडलं
राज ठाकरे हे आज सायंकाळी नाशिकला येणार आहेत. ते उद्या सकाळी नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram Mandir) भेट देऊन महाआरती करणार आहे. या निमित्त काळाराम मंदिर परिसरात कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. बुधवारी या परिसरात राज ठाकरेंचे (Raj Thackeray) बॅनर लावण्यात आले होते. गुरुवारी सकाळी हे बॅनर फाडल्याचे निदर्शनास आले आहे. बॅनर कोणी आणि का फाडले? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस (Police) तपास करत आहेत.
असा आहे राज ठाकरेंना दौरा
राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी त्यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात राज ठाकरे श्रीरामाचे दर्शन आणि महाआरती करणार आहेत. तसेच उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. 9 मार्चला नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचा 18 वा वर्धापन दिन साजरा होईल. आगामी लोकसभेचे रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार आहे. मनसेच्या वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नाशिकचे पदाधिकारी घेतायेत खास काळजी
नुकत्याच पुणे येथील दौऱ्यात पदाधिकारी उशिराने आल्याने राज ठाकरे यांनी थेट पुणे सोडल्याचे समोर आले होते. त्यामुळे असला प्रकार नाशिकमध्ये होऊ नये, याकरिता शहरातील पदाधिकारी कमालीची काळजी घेत आहेत. मनसेप्रमुख येण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या