Maharashtra News : बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) पोटी असा मुलगा जन्माला आला याची खंत असल्याचं म्हणत माजी मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे (Shinde Group) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना ठाकरे (Thackeray Group) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मोदी, शाहांवर वारंवार टीका करतात, त्यांचं तेवढंच काम आहे. एकनाथ शिंदेमुळे ते घराबाहेर पडले, नाहीतर मातोश्रीवरच असायचं असं म्हणत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. 


बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला याची खंत


सकाळी उठल्यापासून फक्त टीका करण्याचं उद्धव ठाकरेंचं काम आहे, त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी असा मुलगा जन्माला आला याची खंत संबंध महाराष्ट्राला  असल्याची टीका रामदास कदमांनी केली आहे. आज एकनाथ शिंदेंमुळे ते बाहेर पडले आहेत, कुणी त्यांना विचारणार नाही, त्यावेळी ते बाहेर पडत नव्हते, कुणाला भेटत नव्हते. मुख्यमंत्री झाल्यानंतरही मंत्रालयात जात नव्हते. पण आज एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्तीने बाहेर पडायला लावलं आहे. 


शिवसेना-भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर


रामदास कदम यांनी मीडियासमोर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. पण, माझी एकच खंत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात जात आहेत, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरु आहे. 


'...तर भविष्यात भाजपवर कुणीही विश्वास ठेवणार नाही'


माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपचे काही नेते येथे बजेटची कामं आणून भूमिपुजन आणि उद्घाटन स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून करत आहेत, हेच मुळात त्रास देत आहेत, असं म्हणत रामदास कदमांनी चव्हाणांवर गंभीर आरोप केले आहेत. हे असं असेल तर भविष्यात भाजपवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतली पाहिजे.


पाहा व्हिडीओ : रामदास कदम नेमकं काय म्हणाले?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी! शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी! केसाने गळा कापू नका, रामदास कदम भाजपवर कडाडले