Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा, कळवणला पोल्ट्री शेडचे पत्रे उडाले, लासलगाव परिसरात दमदार हजेरी
Nashik Rain Update : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
Nashik Rain Update : आज सकाळपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील वातावरण निरभ्र होते, मात्र मागील काही दिवसांच्या तुलनेत आजचे तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. अशातच सायंकाळी जिल्ह्यातील काही भागातील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लासलगाव परिसरात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी (Pre Monsoon) लावली असून असह्य उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कळवणला वादळी वाऱ्याने पोल्ट्री शेडचे पत्रे उडाल्याने शेडमधील अनेक पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.
नाशिक शहराचा जिल्ह्यात कालपासून उन्हाची तीव्रता (Temprature) वाढलेली असून आज सकाळपासूनच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान (Climate) दिसून आले. कालही जिल्ह्यातील अनेक भागात अनेक घरांचे नुकसान झाले. आजही जिल्ह्यातील लासलगावसह (Lasalgaon) कळवण परिसरात वादळीवारासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र वादळी वाऱ्याने घरांसह शाळेचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
लासलगाव परिसरात दमदार हजेरी
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरात मान्सूनपूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढला होता. असह्य अशा उकाड्यापासून नागरिकांची या पावसामुळे सुटका होणार आहे..लासलगाव परिसरात आज अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली. मान्सूनपूर्व मोसमी पावसाने परिसरातील शेतीच्या कामाला वेग येणार आहे..या पावसामुळे परिसरात सुखद गारवा निर्माण झाला आहे...
कळवणला पोल्ट्री शेडचे पत्रे उडाले...
नाशिकच्या कळवण (Kalwan) तालुक्यातील पिळकोस येथे झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे कुक्कुटपालन व्यवसायिक तुषार रामचंद्र सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..वादळी वाऱ्याने पोल्ट्री शेड कोसळून जमीनदोस्त झाला आहे..कोसळलेल्या पोल्ट्री शेडमुळे पोल्ट्रीतील काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.. पोल्ट्रीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे...
मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकले आहे. पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे. अनुकूल वातावरण असल्यामुळे मान्सून केरळमधून पुढे सरकलाय. कर्नाटकच्या काही काही भागात हजेरी लावली आहे. त्याशिवाय बंगालच्या उपसागारचा भागही व्यपला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्राचा मध्य भाग आणि गोवा, महाराष्ट्रच्या किनारपट्टीला मान्सून धडकण्याची शक्यता आहे.