Dindori Lok Sabha Election 2024 : माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी दिंडोरीच्या जागेची मागणी केली आहे. ही जागा आम्हाला सोडली नाही तर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना पडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे दिंडोरी लोकसभा सध्या राज्यभर गाजत आहे. दिंडोरीचे राजकारण तापलेले असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanit Bahujan Aghadi)अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे. 


एकीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अजूनही काही जागांचे वाटप झालेले नाही. त्यात वंचितकडून उमेदवार बदलीचा खेळखंडोबा सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीत दिंडोरी लोकसभेचा समावेश होता. मात्र अचानकपणे प्रकाश आंबेडकरांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे. 


वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी


वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीत दिंडोरी लोकसभेसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्याकडून आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर नवा उमेदवार दिंडोरीतून देण्यात आलाय. आता वंचितकडून मालती शंकर थविल (Malati Shankar Thavil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीचा उमेदवार नेमका का बदलला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. 


दिंडोरीत तिरंगी लढत 


दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता भाजपकडून डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar), शरद पवार गटाकडून भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नक्की कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Dindori Loksabha : 'दिंडोरीची जागा माकपला द्या, अन्यथा तुमचा उमेदवार पडणारच', जे पी गावितांचा शरद पवारांना थेट इशारा


Prakash Ambedkar : भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही, तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन