Sujay Vikhe on Sharad pawar : निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी मिळू नये यासाठी विखेंनी एका उद्योजकाला माझ्याकडे पाठवलं होतं असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथील पत्रकार परिषदेत केला होता. यावर भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


तुमच्यामध्ये एवढा आत्मविश्वास होता तर तुम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तुमचा घरातील उमेदवार (रोहित पवार) का दिला नाही? असं म्हणत सुजय विखेंनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुमच्याकडे दोन-दोन आमदार होते, एक तुमच्या घरातील होता तर दुसरा माजी मंत्री होता. जर तुमच्यात आत्मविश्वास होता तर तुमच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी करायला लावायला हवी होती. पण त्यांना माहिती होत की, घरातील व्यक्तीचं नुकसान होईल म्हणून त्यांनी एकजण पकडला आणि त्याला उमेदवारी दिली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


हा तर हास्यास्पद विनोद 


माझं नाव घेतल्याशिवाय विखेंना राजकारण करता येत नाही दुसऱ्याचे नाव घेऊन स्वतःचे महत्व वाढवून घेणं हे लक्षण शहाणपणाचे नाही अशी टीका शरद पवारांनी केली होती. त्यावर बोलताना आम्ही तर त्यांचं नाव घेतलं नव्हतं. त्यांनीच आमचे नाव भाषणात घेतले. आम्ही आमचा प्रचार करत आहोत. मुळातच बाळासाहेब विखेंपासून शरद पवारांच्या मनात जे विचार आहेत. त्यातून ते प्रत्येक वेळी विखेंचं नाव घेतात. मागच्या निवडणुकीतही त्यांनी तसंच केलं होतं. 40 वर्षांपासून पवारांसोबत आमचा संघर्ष सुरू आहे. आत्तापर्यंत आम्ही असं कधी केलं नाही. त्यामुळे हस्यास्पद विनोद असून जनतेने ऐकावे आणि सोडून द्यावे. 


सुजय विखे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार


दरम्यान, उद्या नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी सुजय विखे मोठ शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. नगरच्या माळीवाडा बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली निघणार असून यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.


आणखी वाचा 


'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर