Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अद्यापही कायमच असल्याचे चित्र आहे. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेतून (Nashik Lok Sabha Constituency) जाहीर माघार घेतली. मात्र त्यानंतरही आतापर्यंत महायुतीत नाशिकच्या जागेचे वाटप झालेले नाही. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी मंत्री छगन भुजबळांसह महायुतीवर निशाणा साधला आहे.  


एकीकडे नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा तिढा कायम असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. आज सायंकाळी वाजेंच्या प्रचारार्थ पक्षाचे सचिव वरूण सरदेसाई नाशिकमध्ये (Nashik News) दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत पाथर्डी फाटा परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 


म्हणूनच छगन भुजबळांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली


नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाही याचे कारण नक्की कोणी हरायचे? किती मतांनी हरायचे? हे तीन पक्षात ठरत नसून सर्व्हेमध्ये नाशिकला शिवसेना (Shiv Sena) जिंकणार असल्याचं समोर आल्याने छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) माघार घेतल्याचे वक्तव्य वरूण सरदेसाई यांनी केले आहे.  


शिंदे गटाचे उमेदवार तोंडावर पडणार 


केवळ नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रात प्रचारात आघाडी घेतली आहे. वाजे हे प्रचंड लोकप्रिय उमेदवार आहेत.  लवकरच नाशिकचे खासदार ते होतील. राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी होतील. नाशिकची परिस्थिती अशी की, उमेदवार ठरत नाही याचे कारण नक्की हरणार कोण? किती मतांनी हरायचे हे तीन पक्षात ठरत नाहीये. भाजप (BJP), राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Faction) नको म्हणतंय, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) उमेदवार तोंडावर पडणार आहेत. मात्र कोण हे अजून ठरायचे बाकी आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनाच (Shi Sena UBT) जिंकणार असा सर्व्हे आला. म्हणूनच भुजबळांनी माघार घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?


Nashik Loksabha : छगन भुजबळांच्या माघारीनंतरही नाशिकचा तिढा सुटता सुटेना; नेमकं चाललंय तरी काय?