नाशिक : राज्यभरातल्या पालकमंत्र्यांची यादी अद्याप जाहीर झाली नसताना नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीच्या मंत्री माणिकराव कोकाटेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला निमित्तही तसंच आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नाशिकच्या दौऱ्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या पत्रकावर कोकाटे यांचा नाशिकचे पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने त्यात सुधारणार करत तो उल्लेख काढून टाकला. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या इतर मंत्र्यांना मात्र धडकी भरल्याचं दिसून येतंय.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नाशिक दौऱ्याची माहिती इतर मंत्र्यांना व्हावी यासाठी एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या नावासमोर कृषिमंत्री तथा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री कोकाटे यांच्या नावावर अंतिम निर्णय झाला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.
एकीकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असताना कोकाटे यांच्या नावासमोर कृषिमंत्री पदासमोर तथा पालकमंत्री उल्लेख केला आणि नंतर काढून टाकला. मात्र या गोष्टीमुळे राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
नाशिकमध्ये पालकमंत्रिपदासाठी भाजप-राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा
नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे चार मंत्री आहेत. या चौघांमध्येही पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा आहे. यांच्यातील पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्यात आमचे जास्त आमदार म्हणून पालकमंत्री आमचाच असेल असं या आधी माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.
पालकमंत्रिपदावरून कुठे संघर्ष?
जिल्हा : ठाणे
एकनाथ शिंदे, शिवसेना
गणेश नाईक, भाजप
----------------------------
जिल्हा :जळगाव
गुलाबराव पाटील, शिवसेना
संजय सावकारे, भाजप
----------------------------
जिल्हा : बीड
पंकजा मुंडे, भाजप
धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : यवतमाळ
अशोक उईके, भाजप
संजय राठोड, शिवसेना
इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : सातारा
शंभुराज देसाई, शिवसेना
शिवेंद्रराजे भोसले, भाजप
जयकुमार गोरे, भाजप
मकरंद पाटील, राष्ट्रवादी
--------
जिल्हा :कोल्हापूर
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
प्रकाश अबिटकर, शिवसेना
असं असलं तरी अनेक जिल्ह्यांमध्ये कोणत्याही संघर्षाशिवाय पालकमंत्रीपद वाटप होईल अशी शक्यता आहे. कारण, अनेक जिल्हे असे आहेत जिथे एकच किंवा दोन मंत्री आहेत.
ही बातमी वाचा: