National Youth Festival नाशिक : यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने संपूर्ण शहर चकाचक करण्याचा निर्धार केला आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 च्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रात असलेल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौक, मोकळे भूखंड, क्रीडांगणे, नाले व नदी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. २६ जानेवारीपर्यंत दररोज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या मोहिमेसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे.
18 टन कचऱ्याचे संकलन
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आणि शनिवारी पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व, सातपूर, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक या सहा विभागातून एकूण 18.1 टन कचरा नाशिक महापालिकेने संकलित केला आहे. या मोहिमेकरिता शहरातील सर्व विभागनिहाय समन्वयक अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून मनपाच्या सर्व उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रस्त्याच्या दुभाजकांचीही स्वच्छता
तसेच या अभियानात मनपाच्या बांधकाम विभागामार्फत शहरातील प्रमुख रस्त्यांचे दुभाजक आणि वाहतूक बेटं स्वच्छ करण्याची मोहीम देखील सुरू आहे. मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राष्ट्रीय युवा मोहोत्सव २०२४ च्या अनुषंगाने सुरू करण्यात आली आहे.
20 समित्यांची नेमणूक, 75 अधिकाऱ्यांवर जबाबदारी
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले असून प्रशासन सध्या चांगलेच कामाला लागल्याचे चित्र आहे.राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) एकूण 20 समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 75 शासकीय अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेकडून स्वच्छता सप्ताह
जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 6 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान विशेष स्वच्छता सप्ताह हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सर्व विभागांना स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या