Nashik Accident News नाशिक : नाशिक जिल्ह्यात अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसात जिल्ह्यात दोन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना निफाड (Niphad) तालुक्यात आहे. निफाड तालुक्यात पुलाचा कठडा तोडून ट्रक थेट नाल्यात घुसला. यात चालक जखमी झाला आहे.


दुसरी घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) मुंढेगाव फाट्याजवळ घडली आहे. रविवारी सकाळी नाशिककडून (Nashik Accidnet News) मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीस जोरदार धडक दिली. यामुळे वयोवृद्ध व्यक्ती जखमी (Injured) झाली. दोन्ही घटनेतील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. 


चालकाचं नियंत्रण सुटलं अन् ट्रक थेट नाल्यात कोसळला


पुलाचा कठडा तोडून कापसाने भरलेला ट्रक (Truck) नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे (Pimpalas Ramache) येथे ही घटना घडली.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील आयशर ट्रक छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून नाशिकच्या दिशेने शनिवारी रात्री जात होता. पिंपळस गावाजवळील रस्त्यावरील वळणाचा अंदाज ट्रक चालकास आला नाही. त्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यामध्ये कोसळला.


वळणामुळे होतात सतत अपघात


या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने निफाड येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या जीवघेण्या वळणामुळे तसेच रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाश झोतामुळे वारंवार अपघात घडतात, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. 


टेम्पोच्या धडकेत वृद्ध जखमी


मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव फाट्याजवळ (Mundhegaon Phata) टेम्पोच्या धडकेत एक जण जखमी झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्धाला जोरदार धडक दिली. या धडकेत वृध्द जखमी (Injured) झाला. भाऊसाहेब पांडुरंग लोहकरे (71 रा. घोटी, इगतपुरी) असे जखमीचे नाव आहे. जखमीला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात (Ghoti Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


National Youth Festival : मैदानांची युद्धपातळीवर डागडुजी; 20 समित्यांची नेमणूक, 75 अधिकाऱ्यांवर जबाबदारी


Nylon Manja : गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची मिळाली माहिती; पोलिसांनी सापळा रचत ठोकल्या बेड्या, 70 गट्टू जप्त