Dev Mamledar Yatra सटाणा : नाशिकच्या सटाणावासियांचे (Satana) आराध्य दैवत असलेल्या देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या (Dev Mamledar Yashwantrao Maharaj) १३६ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने रविवारपासून मोठ्या उत्साहात यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी शासकीय अधिकारी, देवस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते महाभिषेक, पुजा करण्यात आली. दुपारी मंदिरापासून भव्य रथोत्सव काढण्यात येणार आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त सटाणा शहरात (Nashik Satana News) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


दर्शनासाठी उत्तर महाराष्ट्रातून (North Maharashtra) भाविक येत असतात. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी नुकेतच देव मामलेदार यशवंत महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले आहे.  शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या येथील आराध्यदैवत येथील श्री संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या १३६ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त येथे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. रविवारी पहाटे चार वाजता देवमामलेदारांची महापूजा व अभिषेकाने यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त आरम नदीपात्रालगत असलेले मैदान स्वच्छ करण्यात आली आहे. 


मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई


देव मामलेदारांच्या मंदिरावर तसेच परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे चारला बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, प्रतिभा चावडे, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, अर्चना काकडे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड यांच्या हस्ते देवमामलेदारांच्या मूर्तीचा अभिषेक करून विधिवत महापूजा करण्यात आली.


पारंपारिक रथ मिरवणूक मुख्य आकर्षण


शहरातील प्रमुख मार्गावरून दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत पारंपारिक रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवनुकीचे मोठे आकर्षण असते. दरवर्षी अनेक भाविक ही मिरवणूक पाहण्यासाठी येथे दाखल होतात. त्यानंतर मध्यरात्री कीर्तन व जागरण सोहळा देखील होणार आहे.


राज्यभरातून भाविक दाखल


सटाणा हे एकमेव गाव असे गाव आहे की, ज्या गावातील लोक एका सरकारी अधिकाऱ्याची पूजा करतात. मामलेदार या सर्वोच्च पदावर असूनदेखील आपल्या अंगी असलेल्या मानवता, प्रेम, विनम्रता अशा कितीतरी गुणांच्या बळावर देवपदावर जाऊन पोहोचलेले यशवंतराव महाराज सर्वांचाचे प्रेरणास्थान बनले आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य एकादशीला त्यांच्या पुण्यतिथी साजरी केली जाते. यानिमित्त त्यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येथे दाखल होतात.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Police : नाशिक पोलिसांच्या कर्तव्याला सलाम! तब्बल तीन कोटींचा मुद्देमाल मालकांना केला परत


Nashik Fog : नाशिक जिल्ह्यावर पसरली धुक्याची चादर; पाहा खास Photos