नाशिक : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) पार पडताच विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election 2024) शुक्रवार (दि. 07) 31 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आतापर्यंत 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. 


आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये रुपेश लक्ष्मण दराडे यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. बाबासाहेब संभाजी गांगुर्डे यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक सेल संघटनेतून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. संदिप नामदेव गुळवे, अनिल शांताराम तेजा, सागर रविंद्र कोल्हे, अमोल बाळासाहेब दराडे, रखमाजी निवृत्ती भड, संदिप वसंत कोल्हे, भास्कर तानाजी भामरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.


ठाकरे गटाकडून संदीप गुळवे, भाजपकडून धनराज विसपुते निवडणुकीच्या रिंगणात


तर धनराज देविदास विसपुते यांनी भारतीय जनता पार्टी व अपक्षतून अर्ज सादर केला आहे. भागवत धोंडीबा गायकवाड यांनी समता पार्टीतून नामनिर्देश अर्ज सादर केला आहे. संदिप भिमाशंकर गुळवे यांनी अपक्ष अर्ज सादर केला आहे. सुनिल पांडुरंग पंडीत यांनी अपक्ष व भारतीय जनता पार्टीतून अर्ज सादर केला आहे. संदीप गोपाळराव गुळवे यांनी शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अपक्षमधून अर्ज सादर केला आहे. कुंडलिक दगडू जायभाये, अविनाश महादू माळी यानी अपक्ष अर्ज सादर केला आहे. भाऊसाहेब नारायण कचरे यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसमधून अर्ज सादर केला आहे.


दिलीप पाटील काँग्रेसचे उमेदवार, किशोर दराडे शिवसेनेचे उमेदवार 


तर इरफान मो इसहाक यांनी अपक्ष अर्ज सादर केला आहे. दिलीप बापुराव पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे. रणजित नानासाहेब बोठे, सारांश महेंद्र भावसार, संदिप वामनराव गुरुळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. किशोर भिकाजी दराडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून अर्ज सादर केला आहे. सचिन रमेश झगडे, महेश भिका शिरुडे, मुख्तार अहमद शेख यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. किशोर प्रभाकर दराडे यांनी अपक्ष व राष्ट्रीय जनक्रांती पार्टीतून अर्ज सादर केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार


Nashik Teachers Constituency : 'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप