एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Sinnar Accident : नाशिक सिन्नर अपघातप्रकरणात मोठं अपडेट; फरार ट्रक चालकास औरंगाबादमधून घेतलं ताब्यात
शिर्डीला (Shirdi) जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात (Major Accident) झाला. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता.
Nashik Sinnar Accident: अंबरनाथच्या (Ambarnath) मोरीवली गावातून शिर्डीला (Shirdi) जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात (Major Accident) झाला. या अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले असून यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. त्यामुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता. या ट्रक चालकास सिन्नर पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी सहा साडे सहाच्या सुमारास सिन्नर - शिर्डी महामार्गावर खासगी बस व यांच्यात भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की बसची एक बाजूच निखळून पडल्याचे घटनास्थळी दिसून येत होते या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला होता दरम्यान काही वेळापूर्वीच फराळ ट्रक चालक सखाराम बल्लाळला औरंगाबाद वरून काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले.
वावी पोलिसांनी तातडीने तापसचक्रे फिरवत सखाराम बल्लाळ यास औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सिन्नरजवळील पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 45 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. तसेच उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला. या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून उड्या मारून जीव वाचविल्याचे सांगितले.
मोरीवली गावात शोकाकुल वातावरण...
अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी काल रात्री 15 बस करून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युमुखी पडलेले बहुतांशी भाविक हे अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. मोरीवली गावाच्या इतिहासातील इतकी भीषण अपघाताची ही पहिलीच घटना असून एकाच वेळी गावातील तब्बल 10 जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement