एक्स्प्लोर

Trimbakeshwar Jyotirling Mandir : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फाचं कोडं अखेर सुटलं, मंदिर पुजाऱ्यांचा प्रताप

Nashik News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nashik News: नाशिकच्या (Nashik News) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाबाबत (Trimbakeshwar Jyotirling Mandir) महत्वाची माहिती समोर येत असून काही दिवसांपूर्वी पिंडीवर बर्फ जमा होत असल्याचे समोर आले होते. मात्र हा जमा झालेला बर्फ पुजाऱ्यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीत उघड झाले आहे. 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, 30 जून 2022 रोजी पहाटे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ आढळल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला? यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली.

दरम्यान चौकशी समितीत धक्कादायक माहीती समोर आलं असून त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचं समोर आले आहे. अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फ तुंगार ट्रस्टमधील तिघांनी ठेवल्याचं समोर

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. लाखो भाविक या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. इथल्या शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. याचा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आला होता. मात्र हा पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटना निव्वळ बनाव असल्याचे उघड झाले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget