North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, क्रीडा, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, क्रीडा, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषदेत उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या हस्ते करून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई
यंदा नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच 437 गावे आणि वाड्यांना आताच 136 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यंदा अल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच जायकवाडीला नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी खालावली आहे.
























