Raj Thackeray LIVE : अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का नाही झालं, पंतप्रधान आले फुलं वाहून गेले; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

MNS Vardhapan Din : मनसेने नाशिकला अठराव्या वर्धापन दिनाचा मान दिला आहे. या माध्यमातून मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. वर्धापन दिनाचे प्रत्येक अपडेट मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2024 01:03 PM
Raj Thackeray LIVE : मनसे सुरू करते त्याचा शेवट ही करते, राज ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का नाही झाले, पंतप्रधान आले फुलं वाहून गेले, काय झालं त्या फुलांचं. मनसे सुरू करते तसा शेवट ही करते. आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक होती आहे. प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले, आंदोलन यशस्वी केलं, असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray LIVE : माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलन केलं, लाठ्या काठ्या खाल्ल्या, केस घेतल्या : राज ठाकरे

Raj Thackeray LIVE in Nashik : नशीब महाराजाच्या वेळी सोशल मीडिया नव्हता, नशीब नाहीतर गनिमीकावा कसा करतात, हे विचारले असतं. मला भरपूर गोष्टी बोलायचे आहे तर गुढीपाडवा शिवतीर्थवर. माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलन केलं. लाठ्या काठ्या खाल्ल्या. केस घेतल्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackeray LIVE : माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद आहे : राज ठाकरे

राज ठाकरे काय म्हणाले? Raj Thackeray speech Nashik LIVE


सोशल मीडियावर माझ्या बाबतीत ही काहीतरी दाखवतात, गाडी येते मी उतरतो आणि रारारा गाणं लावतात. 
पक्ष म्हटले की लोक बघत नाही. काहीतरी माहिती असेल तरच बघतात. केतन जोशी यांची व्याख्याने जिल्हा तालुका   स्तरावर ठेवणार. 


मनसे ला 18 वर्ष पूर्ण होत आहे.  राज्यातील प्रत्येक प्रमुख शहरात वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरविले आहे.
आज राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे. आजकाल प्रत्येकाला वडा टाकला की तळून आलेला पाहिजे. 
सर्व फास्टफूड पाहिजे. राजकारण मध्ये वावरायचे असेल तर सर्वात महत्वाचे पेंशन्स पाहिजे. 


तुमच्या अजीबाजूचे  यश आपल्याला आज दिसते नरेंद्र मोदी चे यश तुम्हाला वाटत असेल पण त्याचे  20 टक्के यश असेल पण त्या पक्षा साठी इतके वर्ष झटत आलेखस्ता खाल्ल्या त्याचे यश आहे. 


वाजपेयी, अडवाणी,महाजन मुंडे या लोकांची ज्या खस्ता खाल्ल्या हे त्याचे यश आहे अचानक आलेल्या नाही. 
अटल जी याचे सरकार 13 दिवस 13 महिने साडेचार वर्षच सरकार आले. 



18 वर्षात माझे भाग्य समजतो अनेक चढ उतार चढ कमी उतार जास्त पण तुम्ही माझ्या सोबत राहिला. यश नक्की मिळणार, मि मिळवून देणार पण पेशन्स पाहिजे. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या राज्यात दुसऱ्याची पोरं खेळतात,पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद आहे 


 


 

Raj Thackeray LIVE Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, निवडून येणाऱ्या माणसाची मोळी - राज ठाकरे

Raj Thackeray in Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार
राज्यात कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर जनसंघ, शिवसेना आणि मनसे हे आहेत.

Raj Thackeray : मनसेला 18 वर्ष पूर्ण, वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे नाशकात

Raj Thackeray in Nashik : राज ठाकरे म्हणाले की,  सोशल मीडियावर माझ्या बाबतीत ही काहीतरी दाखवतात, गाडी येते मी उतरतो आणि रारारा गाणं लावतात. पक्ष म्हटले की लोक बघत नाही. काहितरी माहिती असेल तरच बघतात केतन जोशी यांची व्याख्याने जिल्हा तालुका स्तरावर ठेवणार. मनसेला 18 वर्ष पूर्ण होत आहे. राज्यातील प्रत्येक प्रमुख शहरात वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरविले आहे. आज राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे. आजकाल प्रत्येकाला वडा टाकला की तळून आलेला पाहिजे.

Raj Thackeray LIVE : राज ठाकरे लाईव्ह

Raj Thackeray LIVE : नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे लाईव्ह पाहा


 



 


 

थोड्याच वेळात नाशकात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मनसेचा 18 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे. यानिमित्त नाशिकच्या दादासाहेब सभागृहात गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे हे सभा स्थळाकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरेंची तोड धडाडणार आहे. 

MNS Vardhapan Din : आगामी काळात मनसे महाराष्ट्रातील मोठा पक्ष असणार - अविनाश जाधव 

आमचं बाळ 18 वर्षांचं झालं आहे. महायुती सोबत जाणार की नाही? हे राजसाहेब ठरवतील. मागचा काळ आमचा अवघड होता. मात्र आज राजसाहेब नवीन रणशिंग फुंकतील आणि यापुढे आमच्यावर चांगले दिवस येतील मनसे महाराष्ट्रातील एक मोठा पक्ष असेल, अशी आम्हाला खात्री असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. 

MNS Vardhapan Din : भगवे फेटे, हातात मनसेचे झेंडे! मनसेच्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांचा जल्लोष

मनसेचा 18 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे. यानिमित्त नाशिकच्या दादासाहेब सभागृहात गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. मोठ्या जल्लोषात कार्यकर्ते पदाधिकारी जमा होत आहे. भगवे फेटे, भगवी टोपी आणि मनसेचा भगवा झेंडा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणांहून कार्यकर्ते जमा होत आहेत. त्यामुळे सभागृहात भगवेमय वातावरण तयार झाले आहे. 

मलाही वाटतं राज साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं - संदीप देशपांडे

MNS Vardhapan Din : आज मनसेचा १८ वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होत आहे. यानिमित्त नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून राज्यभरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होत आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे यापुढे सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल. मलाही वाटतं राज साहेबांनी मुख्यमंत्री व्हावे, असे वक्तव्य केले आहे.

MNS Vardhapan Din : लोकसभा निवडणूक लढवणार का? वसंत मोरेंचं नाशकात मोठं वक्तव्य 

मनसेच्या 18 व्या वर्धापनदिनासाठी राज्यातील पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होत आहेत. पुण्यात कायम चर्चेत राहणारे वसंत मोरे ही वर्धापनदिनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

MNS Vardhapan Din : मनसेचा आज 18 वा वर्धापन दिन

एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. शहरात पक्षाला पुन्हा नवसंजिवनी देण्यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकला अठराव्या वर्धापन दिनाचा मान दिल्याचे दिसून येत आहे. वर्धापन दिनाच्या माध्यमातून मनसे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 


मनसे प्रमुख राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वर्धापन दिनाच्या माध्यमातून  कोणती भूमिका मांडणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असणार आहे. पुढच्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे मनसेच्या वर्धापन दिनाला महत्व आले आहे. 

पार्श्वभूमी

MNS Vardhapan Din : मनसेने नाशिकला अठराव्या वर्धापन दिनाचा मान दिला आहे. या माध्यमातून मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. वर्धापन दिनाचे प्रत्येक अपडेट मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.