North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील बातम्या वाचा इथे...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाचे अपडेट्स, सामाजिक, आर्थिक, राजकीय अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Mar 2024 05:23 PM
पवार साहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करतेय, अमित शाह शरद पवारांवर बरसले

मोदी गॅरंटी देण्यासाठी आलो आहे. तिसऱ्या वेळी सत्ता द्या, भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या नंबरवर झेप घेईल. तुम्ही नोकरीला जाणार तिथे तुमचा बायोडाटा बघितला जाणार की नाही? मग पंतप्रधान बनविताना तुम्ही बायोडाटा बघणार की नाही बघणार?
 
10 वर्षाचा अनुभव आणि पुढील 25 वर्षाचे व्हिजन आहे, असा नेता पुन्हा पुन्हा नाही होत. मुद्रा लोण दिले, स्टार्टअप दिले, डिजीटल व्यवहार झालेत, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलेंडर 50 हजार लोकांना दिले, गरिबीतून लोकांना बाहेर काढले. नळाला पाणी आले. 


पवार साहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करते, तुम्ही 5 वर्षाचा आढावा द्या. तिसऱ्या वेळी मोदींना 400 पार खासदार नेण्यासाठी समर्थन करा. 
 
राम मंदिर आधी बनायला हवे होते की नाही? काशी मथुरा कोरिडोर बनायला हवे होते की नाही? काँग्रेसने मतासाठी रामलल्लाला तंबूत ठेवले. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार केले. 


आम्ही विधानसभांसाठी 30 टक्के जागा महिलांना आरक्षित ठेवणार.  मोदी सरकारने लस देऊन भारताला कोरोन मुक्त केले. 2030 मध्ये जगतील 3 ऱ्या नंबरचे अर्थव्यवस्था आहे. सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 मध्ये लॉन्च झाले नाहीत.


महाविकास आघाडीवर हल्लाबोल 


राज्यात 3 चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिची तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत


 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. 1 लाख मुलं डॉक्टर बनतील. G20 मध्ये महात्मा गांधी यांच्यासमोर  जगभरातील नेते नतमस्तक होत होते.

अमित शाह यांचं भाषण LIVE : जळगावच्या सभेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल

अमित शाह यांचं भाषण LIVE 



 

Amit Shah Jalgaon Sabha LIVE : उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून ते लढतायत, अमित शाहांचा हल्लाबोल

अमित शाह काय म्हणाले? 


 
शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायभरणी शिवाजी महाराजांनी केली. 2024 च्या निवडणुकीबाबतीत बोलण्यासाठी आलोय. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान आहे या गैरसमाजात राहू नका. 2027 ला विकसित भारत बनविण्यासाठी मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे, युवकांच्या भविष्यासाठी मतदान आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मत आहे. 


 
उद्धव ठाकरेंना मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे.जे पक्ष आपल्या पार्टीत लोकशाही नाही, परिवारवादाच्या पार्टी आहेत, त्या पार्टी देशात लोकशाही ठेवू शकतील का? त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचं, तुमच्यासाठी काही नाही. तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत. 
 
पुलवामामध्ये आतंकवादी आले, 10 दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. ही मोदी गॅरंटी आहे.


काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही? 370 कलम 70 वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले त्यांनी 370 हटविले.  राहुल गांधी म्हणत होते खून की नदीया येतील. पण खून की नदी सोडा, एक दगड उचलण्याची हिम्मत कुणाची झाली नाही. 

Amit Shah : जळगावात युवा संवाद कार्यक्रमात थिरकली तरुणाई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जळगाव दौऱ्यावर असून युवा संवाद कार्यक्रमात ते तरुणांशी संवाद साधणार आहेत. या सभास्थळी आता तरुण जमण्यास सुरुवात झाली असून तरुणांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे. गाण्यांच्या तालावर तरुण-तरुणी ठेका धरताना दिसून येत आहेत. यातील अनेकांना रोजगार नसल्याने रोजगार मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे काहींना राम मंदिर झाल्याचा आनंदही आहे. 10 वर्षात बरीच कामे झाली आहेत. आता पुन्हा मोदी सरकार पाहिजे, असे काहीचे म्हणणे आहे. 

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त नाशिकमध्ये जोरदार बॅनरबाजी

मनसेचा 18 व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा नाशिकमध्ये पार पडणार असून राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. यानिमित्त नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात जोरदार बॅनरबाजी केली जात आहे. 

मालेगावात लॉन्समध्ये शिरला बिबट्या, शहरात एकच खळबळ 

मालेगाव शहरात भरवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.  नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये शिरला बिबट्या शिरला होता. यावेळी मोहित विजय आहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये एका खोलीत जेरबंद केले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला रेस्क्यू केले. 

Nashik : सीबीएस-अशोक स्तंभ रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला

गेल्या आठ दिवसांपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु झाले. त्यामुळे नाशिकचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे सीबीएस ते अशोक स्तंभ हा रस्ता तब्बल नऊ दिवसांनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जळगाव दौऱ्यावर

जळगावमधील सागर पार्क मैदानावर आज युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या युवा संमेलनास २५ हजारांहून तरुण उपस्थित राहणार असून अमित शाह तरुणांची संवाद साधणार आहेत. 

Nashik : शेतकरी साहित्य संमेलनाचे नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिकमध्ये शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे.

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाचे अपडेट्स, सामाजिक, आर्थिक, राजकीय अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.