North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2024 05:24 PM
Raj Thackeray : राज ठाकरेंचे थोड्याच वेळात नाशिकमध्ये आगमन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याची सुरुवात होणार आहे. 9 तारखेला मनसेचा 18 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत. आजपासून तीन दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहेत. उद्या शुक्रवारी सकाळी राज ठाकरे काळारामाचे दर्शन घेणार आहे. 

13 मार्चला शरद पवारांची निफाडमध्ये जाहीर सभा

13 मार्चला शरद पवार यांची नाशिकच्या निफाडमध्ये होणार जाहीर सभा होणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार अजित पवार गटात सहभागी झालेल्या नाशिकमधून शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

Nashik : नाशिकमध्ये मनसेचे बॅनर फाडले

मनसेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने नाशिक शहरात अनेक बॅनर्स लावण्यात आले आहेत. काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडल्याची घटना घडली आहे.

राज ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन होणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मनसेच्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे हे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे सायंकाळी नाशिकमध्ये आगमन होईल. यावेळी मनसैनिकांकडून राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. 

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.