Salary : भारतात बहुतांश लोक खासगी क्षेत्रात नोकऱ्या करतात. अशा परिस्थितीत मोकरदारांचा सर्व खर्च हा त्यांच्या पगारातूनच होतो. सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं महागाईनुसार आपला पगार वाढला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या पगारातून काही पैसे वाचवावे अशी जवळफास सर्वांचीच इच्छा असते. मात्र, प्रत्येकालाच वाढत्या खर्चामुळं ते शक्य होत नाही. भारतातील अनेक कंपन्यांमध्ये महागाईनुसार कामगारांचे पगार वाढत नाहीत. दरवर्षी महागाई वाढते पण कामगारांच्या पगारात वाढ होत नाही. महागाईनुसार जर तुमचा पगार वाढत नसेल तर तुम्ही काय कराल? तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

Continues below advertisement


दरवर्षी 6 ते 7 टक्क्यांनी महागाई वाढतेय


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, देशात दरवर्षी 6 ते 7 टक्क्यांनी महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकांचे पगारच वाढले नाहीत तर उदरनिर्वाह कसा चालणार? सामान्यत: देशातील बहुतांश कॉर्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार महागाईनुसार वाढवतात. परंतु जर तुमचा पगार महागाईनुसार वाढत नसेल तर तुम्ही काही पद्धतींचा अवलंब करून तुमचा पगार वाढवू शकता. 


तुमचा पगार वाढवण्यासाठी काय कराल?


पगार वाढवणं का गरजेचं? हे वरिष्ठांना भेटून सांगा


तुम्ही कोणत्याही संस्थेत काम करत असाल, तुम्हाला त्या संस्थेची पगार रचना माहित असणे आवश्यक आहे. तुमच्या कामानुसार तुमचा पगार कमी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे तुमच्या वरिष्ठाला सांगू शकता. पण बोलताना तुमचा पगार कमी कसा आहे? तो का वाढवावा? हे सांगावे लागेल.


फील्ड बदलण्याचा विचार करा


तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुमच्या कामासाठी जास्त पैसे मिळत नसतील तर तुम्ही तुमचे क्षेत्र बदलण्याचाही विचार करु शकता. तुम्ही अशा क्षेत्रात जाऊ शकता ज्याची आज जास्त गरज आहे किंवा त्या क्षेत्राला मागणी आहे.


अनुभवाच्या आधारावर तुम्ही नोकरी बदला


तुम्ही एकाच ठिकाणी किंवा एकाच पोस्टवर अनेक वर्षांपासून काम करत असाल, तर तुम्ही इतर कोणत्या तरी संस्थेत नोकरी शोधू शकता. तुमचा अनुभव आणि कामाचा विचार करता तुम्हाला उच्च पदाची नोकरीही मिळू शकते. तुमच्या अनुभवाच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.


महत्वाच्या बातम्या:


Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ