बीड:  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने सुरवातीला आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यास धमकावले होते. असा उल्लेख तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


मी व शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले हा आमच्या मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्याने पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा. असे म्हणून केज मध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणचे आवादा कंपनीचे सर्व काम बंद करा, अन्यथा तुमचे हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकील, असे म्हणत धमकी दिली होती. 6 डिसेंबर रोजी पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या घटनेनंतर केज पोलीस ठाण्यात प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीत हा उल्लेख करण्यात आला आहे.


तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन


दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी वाल्मिक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचे समोर आलं आहे ही धमकी वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दिली होती. या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदु शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे. आता हे रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागलं आहे त्यामुळे त्याची तपासणी केली जात आहे.  दोन कोटीच्या खंडणीसाठी वाल्मीक कराडने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता. हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता. त्यावेळी विष्णूने वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले होते. यावेळी बोलताना वाल्मीक कराडने सुदर्शनने सांगितलं आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुद्धा कार्यालयामध्ये पोहोचला होता.  


चार लोखंडी रॉड, फायटर, कत्ती आणि लाकडी काठीने केली मारहाण


सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आणखी दोन आरोपींचा यात समावेश करण्यात आला आहे. या घटनेत सरपंच देशमुख याला झालेल्या मारण्यात तब्बल 56 जखमा अंगावर आढळून आल्या. ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी 41 इंच होती. त्यावर मूठ तयार करून हत्यार बनविण्यात आले. तसेच लाकडी दांडा तलवारी सारखे धारदार शस्त्र, चार लोखंडी रॉड, लोखंडी फायटर धारदार कत्ती वापरण्यात आली. त्यातील एक गॅस, पाच क्लस वायर, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिक पाईपचे तुकडे स्कॉर्पिओ, स्विफ्ट गाडी आणि पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.


आणखी वाचा