मालेगाव  : एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही... हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहे... महात्मा गांधीचे (Mahatma Gandhi) वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचे सांगत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे खरंच गांधी आहेत का? त्यांचे मूळ नाव 'खान' असल्याची टिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली. 


देशभरात काल देशाचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालेगाव शहरात देखील तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले. भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टिका केली.


यावेळी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) म्हणाले की, "एक तर तू गांधी नाही अन् सावरकर (Veer Sawarkar) पण नाही... हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत... महात्मा गांधीचे वंशज नाही, तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केला. या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? अशी टिका शरद पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानात केली. राफेल प्रकरणात सुद्धा त्यांनी सुप्रिम कोर्टात माफी मागितली. जोपर्यंत अपिल करण्याची संधी आहे, तोपर्यंत हे कोर्टात माफी मागत असतात. सावरकर प्रकरणात हेच झाले, असेही पोंक्षे म्हणाले.


पालकमंत्र्याचीही उपस्थिती 


मालेगाव येथील भारतीय विचार विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर विचारांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे आयोजन सटाणा नाका भागातील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. या व्याख्यानास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याचे पाहायला मिळाले.


 'मी नथुराम गोडसे बोलतोय' पुन्हा रंगमंचावर 


अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहेत. शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं. एकीकडे हे नाटक गाजत असताना दुसरीकडे या नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण आता पुन्हा या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे. शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची घोषणा केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार