नवी दिल्ली : देशभरात मंगळवारी 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023)  साजरा करण्यात आला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना मोदींनी घराणेशाहीचा उल्लेख केला आणि मोदींच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधीत केलं. संबोधनात मोदींनी देशाच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या तीन गोष्टीचा उल्लेख केला. मोदींनी घराणेशाहीचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. मात्र मोदींच्या टीकेला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं उत्तर दिलं



  • काँग्रेस - गांधी कुटुंबाचं वर्चस्व सध्या राहुल गांधी महत्वाचे नेते

  • समाजवादी पक्ष  - मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व सध्या अखिलेश यादव यांच्या हाती पक्षाची धुरा

  • राष्ट्रीय जनता दल  - लालू प्रसाद यांचं वर्चस्व आज घडीला तेजस्वी यादव  पक्षातील महत्वाचे नेते

  • शिवसेना (ठाकरे गट)- बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व

  • तृणमुल काँग्रेस - ममता बॅनर्जी सर्वेसर्वा अभिषेक बॅनर्जी क्रमांक दोनचे नेते

  • झारखंड मुक्ती मोर्चा - शिबु सोरेन यांच्यानंतर हेमंत सोरेन यांच्याकडे नेतृत्व

  • डीएमके-  करूणानिधी  यांच्यानंतरएमके स्टॅलिन यांच्याकडे पक्षाची धुरा

  • राष्ट्रवादी- शरद पवार  आणि पवार कुटुंबियांचं एकहाती वर्चस्व


विरोधकांच्या आघाडीतील याच घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. मात्र विरोधकांनी  भाजपमधल्या घराणेशाहीकडे मोदींचं लक्ष वेधलंय.


भाजपमधील घराणेशाही 



  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गंगाधरपंत फडणवीस यांचे पुत्र आहेत. गंगाधरपंत हे विधानपरिषदेचे सदस्य होते.

  • पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे भाजपचे दिवंगत नेते - गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या

  • खासदार पूनम महाजन- भाजपाचे दिवगंत नेते प्रमोद महाजन यांची कन्या 

  • खासदार हिना गावित - भाजपाचे नेते विजयकुमार गावित यांची कन्या

  • खासदार दुष्यंत सिंग - राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र

  • वसुंधरा राजे - आई विजया राजे यांचा भाजपच्या स्थापनेत मोलाचा वाटा

  • मंत्री ज्योतिरादित्य शिंदे - काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र 

  • मंत्री अनुराग ठाकूर - माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल  यांचे पुत्र 

  • आमदार पंकज सिंग- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र

  • मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ - महंत अविद्यनाथ यांचे वारसदार


अशाप्रकारे भाजपमध्येही घराणेशाहीचा  आलेख चढता आहे. त्यामुळे विरोधक मोदींच्या घराणेशाहीच्या आरोपाला भाजपमधील घराणेशाहीकडे बोट करत उत्तर देतात. देशाच्या राजकारणात बहुतांश नेत्यांनी मुलांनाच राजकीय वारसदार केले. पुढेही  असंच सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराणेशाहीचा मोदींचा आरोप त्यांच्याच पक्षाकडे पाहिल्यानंतर  कमकवुत वाटतो.


हे ही वाचा :