नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 15 ग्रामपंचायती (Grampanchyat) मधील सरपंच आणि सदस्यांच्या 18 रिक्त जागांसाठी मतदान (Voting) प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळच्या सुमारास मतदारांनी गर्दी केली, मात्र दुपारनंतर संथ मतदान झाले.  मात्र शेवटच्या तासाभरात बुथवर प्रचंड गर्दी होऊन मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.  त्यानुसार साडेपाचपर्यंत जिल्ह्यात 82.35 टक्के मतदान झाले आहे. 


राज्यभरात ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर पहायला मिळाला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. नाशिक जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यात सकाळपासूनच मतदार उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या लागल्याचे पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास काहीशी गर्दी कमी झाली होती. मतदार येतच होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे 73 तर सायंकाळपर्यंत 82.35 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ संपुष्टात येईपर्यंत हक्काचे मतदान करण्यासाठी उमेदवारांसह समर्थकांची धावपळ पाहायला मिळाली. त्यांनतर अचानक गर्दीही झाली होती.


आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत रविवारी मतदान झाले. जिल्ह्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. तर अर्ज माघारीनंतर 45 ग्रामपंचायतीत सदस्यांच्या 200 जागांसाठी तर 44 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. या शिवाय 16 ग्रामपंचायतीत 15 सदस्य आणि सरपंचाच्या तीन अशा एकूण 18 जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. या सर्व ठिकाणी रविवारी मतदान पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली.


एकुण 66 हजार 800 ग्रामस्थांपैकी साधारणत: 82 टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदानाच्या आधीच इगतपुरीतील धारगाव ग्रामपंचायतीच्या दोन महिला उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


उद्या प्रत्यक्ष मतमोजणी 


दरम्यान सोमवारी प्रत्येक तहसील कार्यालयावर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. तहसील कार्यालयांमध्ये सकाळी 10 पासून मतमोजणीला होणार असून एक ते दोन तासांमध्ये म्हणजेच बारा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावचा कारभारी कोण होणार हे चित्र अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार असल्याने साऱ्यांच्याच नजरा मतमोजणीकडे लागून राहिल्या आहेत.


हेही वाचा : 


Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह, शातंतेत मतदान; विजयाचा गुलाल कोण उधळणार? उद्या मतमोजणी