नाशिक : जायकवाडीच्या (Jayakwadi) बॅकवॉटरने उसाची शेती केली जाते. एका बाजूला दुष्काळ म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला उसाची शेती करायची आणि एका बाजूला पाणी नाही म्हणून, ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूला उसाच्या शेतीला (Sugarcane) जवळपास 26 टीएमसीसारखं पाणी वापरायचं असा आरोप करत ही खूप मोठी तफावत असून याच्यावर न्यायालयाने देखील लक्ष द्यावं अशी मागणी असल्याचे आमदार देवयानी फरांदे (devyani Farande) यांनी सांगितलं. 


नाशिकहून (Nashik) जायकवाडीला पाणी सोडण्यावरून सुरु असलेल्या वादात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. या पाणी प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाचेच नेते आमनेसामने आले आहेत. मराठवाड्याचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Raut) यांनी पाणी न सोडल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. तर याच इशाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर नाशिकच्या (Nashik Politics) भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिले आहे. 'एका बाजूला दुष्काळ म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला उसाची शेती करायची आणि एका बाजूला पाणी नाही म्हणून, ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूला उसाच्या शेतीला जवळपास 26 टीएमसीसारखं पाणी वापरायचं असा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 


देवयानी फरांदे यावेळी म्हणाल्या की, मराठवाड्याला पाणी द्या परंतु मृत साठ्यामधून द्या, अशी पहिल्या दिवसापासून मागणी आहे. मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये 26 टीएमसी हा मृत्यू साठा असून मृत साठ्यामधून पाच टीएमसी पाणी जर मराठवाड्याला (Marathawada) दिलं तर नाशिक, नगर आणि मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. यावेळेस नाशिक विभागामध्ये फक्त 52 टक्के इतका सरासरी पाऊस झालेला आहे. आत्ताच विहिरी आटलेल्या आहेत. यावेळी पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये (Nashik Rain) पाण्याचा शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी झालेली होती. एकूणच पिण्याच्या पाण्याचं देखील भीषण संकट आहे. त्यामुळे आता नाशिकच्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडता येणार नसल्याची भूमिका फरांदे यांनी व्यक्त केली. 


मृत साठ्यामधून मराठवाड्याला पाणी द्यावे.... 


नाशिक आणि मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न हा सरकारच्या हातात राहिलेला नाही. 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाचा जो कायदा झालेला आहे. त्या समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुसरीकडे मेंढीगिरी समितीच्या अहवालावर हे पाणी सोडायला लागत होतं. मेंढेगिरी समितीने खुद्द सांगितलं होतं की दर पाच वर्षांनी याचं फेर नियोजन आणि अवलोकन व्हायला पाहिजे. राज्य सरकारने आता अवलोकन करण्यासाठी घेतलेले असून त्यामुळे मागणी आहे की हे पाणी आता सोडू नये. जर मराठवाड्याला पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यकता असेल तर त्यांना मृत साठ्यामधून पाणी वापरण्याची आवश्यकता आहे. तसेच राज्य सरकारकडे देखील मागणी केलेली आहे. जायकवाडीच्या मृत साठ्यामधून पाच टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यावे, याबाबतची परवानगी राज्य शासनाने द्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 


उसाच्या शेतीसाठी 26 टीएमसी पाणी 


मराठवाड्याच्या सर्व नेत्यांना प्रश्न आहे की जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून जे अनधिकृतरित्या पाणी उपसा करून साखर कारखान्यांना पुरविले जात आहेत. तीन तालुक्यांमध्ये नऊ साखर कारखाने आहेत, त्याच्यामध्ये जे काही ऊसाची शेती केली जाते. जायकवाडीच्या बॅकवॉटर आजूबाजूला तीन तालुके असून या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची शेती केली जाते. याच तालुक्यात अनेक साखर कारखाने असून या कारखान्यांमधून गाळप होणाऱ्या जवळपास 45 हजार टन साखरचे उत्पादन घेतले जाते. यासाठी जवळपास 26 टीएमसी पाणी लागते आणि हे 26 टीएमसी पाणी अनधिकृतपणे उचलले जाते. या 26 टीएमसी पाण्यामध्ये अख्खा मराठवाडा पाणी पिऊ शकतो. मात्र जायकवाडीच्या कॉटरमध्ये चालू असलेल्या साखर कारखान्यावर होणारी ऊसाची शेती यावर कोणीही बोलत नसल्याचे आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार! आमदार शिरसाट यांच्याकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा