Nashik Leopard News : नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्यांचा (Leopard) वावर वाढत आहे. मंगळवारी सकाळी मखमलाबाद (Makhmalabad) परिसरातील महाले मळ्यात मृत अवस्थेत बिबट्या आढळला. मृत बिबट्याचा पंचनामा करून त्यास शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. मखमलाबाद परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) घबराट पसरली असून या भागात वनविभागाने (Forest Department) तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून मखमलाबाद परिसरातील गंगापूर कॅनॉल, जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसर, महाले मळा आदींसह नाशिकच्या काही भागात (Nashik Latest News)  बिबट्यांचा वावर वाढला आहे. या भागातील अनेक कुत्री , वासरू, गायींचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला आहे. मळे भागात बिबट्यांचा (Leopard) वावर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.


शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - (Fear among Farmers)


गेल्या महिन्यात सिडको, नाशिकरोडसह अन्य काही परिसरात वनविभागाने बिबटे जेरबंद केले आहेत. मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसरात तानाजी काकड या शेतकऱ्याच्या वासराचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी मध्यरात्री याच रस्त्यावरील थोरात मळ्यातील दीपक थोरात यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



शेताच्या बांधावर आढळला बिबट्याचा मृतदेह - (Leopard found on Farm)


थोरात यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच बिबट्या मृतदेह शेतीच्या बांधावर आढळला आहे. ही माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.  
      


मृत्यूचे कारण शिवविच्छेदनानंतर होणार स्पष्ट


मखमलाबाद परिसरातील महाले यांच्या शेताच्या बांधावर मृत अवस्थेत आढळलेला बिबट्या हा नर आहे. त्याचे वय सुमारे ७ ते ८ वर्ष असून शिवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल,अशी माहिती वनविभागाने दिली आहे.


फोटो सेशनसाठी नागरिकांची झुंबड


बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मयत बिबट्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. त्यामुळे वनविभागाने बिबट्यावर कपडा टाकून त्यास झाकून ठेवल्याचे दिसून आले.  


आणखी वाचा


RBI सह मुंबईत 11 ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी, खिलापत इंडिया नावाने मेल; धमकी देणाऱ्याचा शोध सुरू


Rajnath Singh On Ship Drone Attack : भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; भारताची आक्रमक भूमिका