Nashik Weather News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गारठा (Cold) वाढला आहे. आज नाशिकचे (Nashik Latest News) किमान तापमान 12. 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर सोमवारी कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्यामुळे  सकाळी थंडी तर दुपारी उन्हाची अनुभूती नाशिककर घेत असल्याचे चित्र आहे.

  
  
यंदाच्‍या हिवाळी हंगामात (Winter Season) कधी गारठा तर कधी सामान्‍य वातावरण अनुभवायास मिळत आहे. यंदाच्‍या हंगामातील निचांकी तापमान (Minimum temperature) 16 डिसेंबरला 12.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.  गेल्‍या दहा दिवसांपासून सरासरी किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्‍या जवळपास राहत होते. तर कमाल तापमानातही मोठी तफावत दिसून आली. गेल्‍या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा जोर पुन्‍हा वाढला आहे. नाशिकचे किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने किमान तापमानात घट, तर दुपारी प्रखर सूर्यकिरणांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली आहे. 

निफाडला निचांकी तापमानाची नोंद - Niphad Recorded Lowest Temperature

यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये करण्यात आली आहे. शनिवारी तापमान 11.2 अंशावर होते. रविवार 9.1 अंश तापमान नोंदवले गेले. सोमवारी 8.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

जळगावातही गारठा वाढला - Jalgaon Weather Update

उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीचा गारठा जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी जळगावचे किमान तापमान राज्‍यात निचांकी राहिले होते. सोमवारी देखील जळगावचे किमान तापमान 9.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

रब्बी हंगामाला लाभदायक

यावर्षीच्या हंगामात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगाम तोट्यात आला. पाऊस (Rain) कमी झाल्याने रब्बी हंगामाबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी चिंता होती. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने या वातावरणाचा लाभ रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारीसह कांदा व इतर पिकांना पोषक ठरणार आहे.

असे आहे नाशिकचे तापमान

दिनांक  किमान  कमाल
6 डिसेंबर   18.8 30.7
7 डिसेंबर 16.0 30.9
8 डिसेंबर  14.8  28.2
9 डिसेंबर  10.0  27.4
10 डिसेंबर  10.4  28.6
11 डिसेंबर  12.5 30.3

राज्यावर पावसाचं सावट

राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पारा कमालीचा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे, पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. मुंबईठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे. राज्यातील वर्षाअखेरपर्यंत असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे.

 

आणखी वाचा 

Gold Rate Today : सोन्याला झळाळी! चांदीचाही भाव वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव जाणून घ्या