नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर भुजबळ यांचा उद्या वाढदिवस असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची तपासणी केली जाणार असून भुजबळांच्या थेट जवळ जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच छगन भुजबळ यांना धमकीचा कॉल आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील भुजबळ फार्म हाऊसवर पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून कार्यकर्त्यांना मनाई करण्यात येत आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांचा उद्या वाढदिवस असल्याने या पार्श्वभूमीवर देखील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची तपासणी केली जाणार असून शाईचा पेन, पावडर,आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान भुजबळांना धमकीचा कॉल आल्यानंतर तातडीने पोलिसानं माहिती देण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधितांचा शोध सुरु असून याच पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच उद्या मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस असल्याने प्रत्यके व्यक्तीला तपासून आत पाठवले जात आहे. तसेच भुजबळ फार्मवर शाईचा पेन, पावडर, आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या वाढदिवसानिमित्ताने पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तसेच मंत्री भुजबळ यांच्या थेटजवळ जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. आजपासूनच भेटायला येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.
सात कोटींचा वाद काय झाला?
समता परिषदेच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी बोलतांना भुजबळ म्हटले की, 100 एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या याच टीकेला मनोज जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहे. भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, “सात कोटी जमा केल्याचे त्यांना कोणी सांगितले. त्याला (भुजबळ) पाहिजे का दोन एक हजार डीझेल टाकायला. भुजबळ आता काहीही बोलयला लागले आहे. त्यांना काही झालं आहे का? सरकारने त्यांना लवकर रुग्णालयात नेले पाहिजे. एवढा मोठा माणूस असे काहीही कसा बोलू शकतो. मी केलेल्या एवढ्या दौऱ्यात एकही मराठा म्हणाला मी 50 रुपये घेतले, तर तो म्हणेल ते करायला मी तयार आहे.
इतर महत्वाची बातमी :