नाशिक : 'कुठल्याही समाजाला आदिवासींमध्ये समावेश करणार नाही त्यामुळे राजीनाम्यांचा विषयच येत नाही' असे म्हणत आदिवासी बांधवांच्या आंदोलनांवर खुद्द आदिवासी विकास मंत्र्यानीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. अशातच विजयकुमार गावितांच्या (Vijaykumar Gavit) प्रतिक्रियेमुळे सत्ताधारी आदिवासी नेत्यांमध्येच दोन गट पडले का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
धनगर समाजाला (Dhangar Aarakshan) आदिवासींमधून आरक्षण (Trible Reservation) देण्यात यावे, अशी धनगर समाज संघटनांकडून मागणी केली जात आहे. सुरवातीला स्थानिक पातळीवर आंदोलन केल्यानंतर आता जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात येत आहे. कालच नाशिकमध्ये आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्यासह हिरामण खोसकर, जेपी गावित आदींनी सहभागी होत विराट मोर्चाचे काढण्यात आला. जवळपास पंधरा ते सोळा हजाराहून अधिक बांधवानी सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी नरहरी झिरवाळ यांनी धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देऊ नये अन्यथा आम्ही सगळे आमदार राजीनामा देऊ, असा इशारा यावेळी दिला. यावर बोलताना विजयकुमार गावित यांनी कुठल्याही समाजाचा समावेश आदिवासींमध्ये होणार नाही. आरक्षणाची आम्ही कुठेही शिफारस वगैरे केलेली नाही, असे ते म्हणाले आहेत.
विजयकुमार गावित म्हणाले की, मी यापूर्वीच जाहीर केले आहे की कुठल्याही समाजाला आदिवासींमध्ये समावेश करणार नाही, त्यामुळे राजीनाम्यांचा विषयच येत नाही. मी स्पष्टपणे सांगितलंय की कुठल्याही समाजाचा समावेश आदिवासींमध्ये होणार नाही. आरक्षणाची आम्ही कुठेही शिफारस वगैरे केलेली नाही, एकीकडे मोर्चे निघाले की दुसरीकडे काढले जातात, हे घडतच राहते. काल मोर्चात सत्ताधारी आमदार पण होते, असा प्रश्न केल्यावर ते म्हणाले की, मराठा आरक्षण, ओबीसी, आदिवासी किंवा धनगर असेल. सर्व सत्तेत आहेत तरी मोर्चे काढतातच आहे, नविन नाही. त्यांना वाटते की आम्ही काढले तर जे चालले ते बंद होईल, त्यामुळे ते करत असतात, त्याने काही फरक पडत नाही. त्यामुळे जी गोष्ट होणारच नाही त्याबाबत पुढच्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही, असे आवाहन आदिवासी आमदारांना केले आहे.
आदिवासी नेत्यांमध्येच दोन गट पडले का?
धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्यात येऊ या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या आंदोलनांवर खुद्द आदिवासी विकास मंत्र्यानीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा चर्चेचा विषय ठरत असून सत्ताधारी आदिवासी नेत्यांमध्येच दोन गट पडले का? असा प्रश्नही आता उपस्थित होतो आहे. कालच नाशिकमध्ये निघालेल्या आदिवासींच्या विराट मोर्चानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आम्ही 25 आदिवासी आमदार राजीनामे देणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान या प्रश्नावर आज नाशिककमध्ये आदिवासी विकास मंत्र्यानी आपली भूमिका मांडतांना 'मी यापूर्वीच जाहीर केले आहे की कुठल्याही समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करणार नाही, त्यामुळे राजीनाम्यांचा विषयच येत नसल्याचं' म्हणत जी गोष्ट होणारच नाही, त्याबाबत पुढच्या गोष्टीचा विचार करण्याची गरजचच नसल्याचंही मंत्री गावितांनी बोलून दाखवल आहे.
इतर महत्वाची बातमी :