नाशिक : नाशिकसह (Nashik) जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत व्याकुळ झाला असून सातत्याने पाऊस पडण्यासाठी साकडे घातले जात आहे. काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील मुस्लिम बांधवानी एकत्र ईदगाह मैदानावर नमाज पठण करत पावसाला (Nashik Rain Update) साकडे घातले होते. आता नांदगाव (Nanadgaon) तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवानी एकत्र येत दुवा पठण केले आहे. 'काही चुका झाल्या असल्यास आम्हाला माफ कर, अन् पाऊस पडु दे अशी दुवा करण्यात आली आहे.
गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने (Nashik Rain) नाशिकसह जिल्हाभरात ओढ दिली असून पावसाचा ऑगस्ट महिना देखील सरत चालला आहे. तरीदेखील पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच मराठवाड्यासह (Marathwada) राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरून वरुणराजाला साकडे घालण्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. नाशिकच्या मालेगाव पाठोपाठ नांदगावमध्येही पावसाला आळवणी घालण्यासाठी मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज व दुवा पठण (Duva) केले. नांदगाव शहरातील ईदगाह मैदानावर मौलाना मुफ्ती मोहम्मद फईम यांनी यावेळी पावसाला साकडे घालतांना दुवा पठण केले.
येवला, मनमाड, नांदगाव, देवळा, बागलाण (Baglan) आदी परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक पावसाला हाक देत आहेत. नांदगाव तालुक्यात देखील अनेक धरणे कोरडीठाक असून दमदार पावसाच्या प्रतीक्षा आहे. अशातच तालुक्यातील मुस्लिम बांधवानी एकत्र दुवा पठण केले. ईदगाह मैदानावर मौलाना मुफ्ती मोहम्मद फईम यांनी यावेळी पावसाला साकडे घालतांना दुवा पठण केले. 'आमच्याकडून अनवधानाने काही चुका झाल्या असल्यास परमेश्वरा आम्हाला माफ कर, अन् पाऊस पडू दे..' पाऊस नसल्याने निसर्गचक्र थांबू लागले आहे. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होवू शकते, शेतीला कुठेही पाणी मिळत नाहीये, त्यामुळे आम्ही विनंती करतो पण तू पाऊस पाड...अशी प्रार्थना नांदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी अल्लाहला केली.
दरम्यान, अवकाळी पाऊस व गारपिटीने अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला खरीप पिकानेही साथ दिली नाही.. पावसाळा पूर्णपणे कोरडाच जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे
खरीप हंगामातील पिकांची चिंता
नाशिक जिल्ह्यात (Nashik News) पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमान या कालावधी 348 मिलिमीटरपर्यंत जाण्यापेक्षा असताना यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे अजूनही जिल्ह्यातील पाऊस 60 टक्क्यांच्या पुढेही सरकलेला नाही. सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांना चिंता आहे. पुरेसा पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. तर पुढील पिकांच्या लागवडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत महत्त्वाचं पीक म्हणून ओळख असलेल्या भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. धरणांचा जिल्हा म्हणून अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही धरणांच्या साठ्यात वाढ दिसत आहे. तर काही धरणांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.