नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो, आमचीही तीच भूमिका असून अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहेत. दादा जसे नेते तसे आम्ही भुजबळ, मुंडे सुद्धा कार्यकर्ते आहोत. आम्हीही तेच म्हणतोय, म्हणून आम्ही भेटलो. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट नाही, फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला असून आम्ही पक्ष सोडलेला नाही, आमची निशाणी घड्याळच आहे, आमचा झेंडा तोच आहे, असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे. 


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले असून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपलं मत व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले की, 'शरद पवार यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो, आमचीही तीच भूमिका असून अजित पवार आमचे नेते आहेत. दादा जसे नेते तसे आम्ही भुजबळ, मुंडे सुद्धा कार्यकर्ते आहोत. आम्हीही तेच म्हणतोय, म्हणून आम्ही भेटलो. त्यामुळे राष्ट्रवादीत (Maharashtra NCP) फूट नाही, फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला असून तुम्ही ही समर्थन द्यावे, एवढंच आमचं म्हणणे आहे. 


तर छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी भवन येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, 2014 मध्ये भाजपने समाज माध्यमांचा मोठा उपयोग करून घेतला. तसा विचार देखील कुणी केला नव्हता. मी जर ऑनलाईन भाषण केलं, तर लाखो लोकांशी बोलू शकतो. मागच्या आठवड्यात मी माझं म्हणणं मांडलं. त्याच्यावरून आता सुरुवात झाली. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे मनोहर कुलकर्णी आहे की नाही? मी म्हणालो. शक्यतो संभाजी, शिवाजी असं नावं नसतात. मग ते म्हणाले, नावं आहे. पण वाद तो नाहीच, संभाजी भिडे हा मुद्दा आहे. पण ते वेगळ्या पद्धतीने पसरवण्यात आले. हे आंदोलन, ते आंदोलन. मते बनवण्यासाठी या समाज माध्यमांचा उपयोग होत आहे. मात्र याच माध्यमातून वक्तव्याचा विपर्यास केला जातो. काही मंडळी पराचा कावळा करतात. राजकारणात विकास हा महत्त्वाचा असतोच, पण भावना आणि तत्व देखील महत्त्वाचे असतात. अनेक लोकं ही भावनेने जोडली जातात. त्यासाठी मताचा विरोध मताने करायला हवा.


कांदा प्रश्नावर भुजबळ म्हणाले... 


कांदा प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, पियुष गोयल यांच्याशी बोललो असून स्थानिक बाजार समितीच्या लोकांशी बोलतो आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू असून व्यापारी देखील बाजार समित्यांमध्ये येत आहेत. तसेच केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नाफेडकडून कांदा खरेदी सुरु आहे. त्यामुळे हळूहळू सुरळीत होईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच 2 लाख टन कांदा घ्यायचा असेल तर नाफेडचे केंद्र वाढवायला पाहिजे, सद्यस्थितीत 32 केंद्रामार्फत कांदा खरेदी सुरु असून केंद्र मार्केटजवळ असावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात व्यापारी आणि नाफेड केंद्राच्या लोकांची बोलणी सुरू आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होतं, याच दुःख आहेच, भाव पुढे वाढतील, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. 


 


इतर महत्वाची बातमी : 


 


Ambadas Danve : पवारांच्या सततच्या वक्तव्यांमुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; अंबादास दानवे थेटच बोलले