Rain : मुंबईसह कोकण वगळता राज्यात पावसाची शक्यता कमीच
ध्या राज्यात पावसानं (Rain)दडी मारली आहे. पावसाअभावी खरीपाची पिकं (Kharif crops) वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Mainkrao Khule) यांनी दिली आहे.
पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकण आणि काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे.
सप्टेंबर 7 नंतरच्या पावसाची स्थिती त्यावेळीच वातावरणातील बदलावर अवलंबून असेल असे खुळे म्हणाले.
जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतानाही समाधानकारक पाऊस झाला नाही.
सध्या एल निनोच्या प्रभावामुळं कमी पाऊस पडत आहे.
केवळ पावसावरच अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची जिरायती पिके माना टाकत आहेत.
पिकांना पाण्याची खूप गरज आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. काही ठिकाणी शेतकरी पिकांवर रोटवेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत.