एक्स्प्लोर

Nashik News : 'पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, पण शिवसेना स्वस्थ बसणार नाही, खासदार संजय राऊत यांचा सरकारला इशारा 

Nashik Sanjay Raut : नाशिक (Nashik) मध्ये कोट्यवधींचा ड्रग्जचा व्यापार चालला आहे. वेळ आलीय या सर्वांना रामकुंडात बुडवा नाही तर तुडविण्याची.

नाशिक : 'नाशिक (Nashik) हा आमचा आत्मा असून आमचा देव, आमचा धर्म इथं आहे. मात्र इथं कोट्यवधींचा ड्रग्ज व्यापार चालला आहे. वेळ आलीय या सर्वांना रामकुंडात बुडवण्याची नाही तर तुडविण्याची. 'धमक्या देत आहात, अटक करण्याची भाषा करताय, अटक करा, तुरुंगात टाका, एकदा जेलमध्ये जाऊन आलोय, परत जाईल, या महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी. त्यामुळे शिवसैनिकांना धमक्या देऊ नका, नाशिक ड्रग्जमुक्त (Nashik Drug Case) केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय राऊत (sanjay Raut) यांनी भाजपसह सरकारला दिला. 

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात आज ठाकरे गटाकडून मोठा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट (Nashik Drug Racket) चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर ठाकरे आक्रमक भूमिका घेत आज याच मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान प्रचंड प्रतिसाद मोर्चाला मिळाला. या सगळ्या मोर्चेकरांना संबोधित करताना संजय राऊत यांनी भाजपवर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. संजय राऊत म्हणाले की, नशेमुळे मुलांनी आत्महत्या केल्या, त्यावर कोणी बोलत नाहीत. मुंबईत पत्रकार परिषदा काय घेता असा अप्रत्यक्ष सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केला. तर येथील पालकमंत्र्यांना काय मिळत होतं, त्याचा हिशोब गृहमंत्र्यांना माहिती असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. नाशिकमधील ड्रग्जचा विषय मोठा असून तरुण नशेच्या आहारी जात आहेत, हे थांबलं पाहिजे. असेही राऊत म्हणाले. 

संजय राऊत पुढे म्हणाले की, नाशिकमधील (Nashik Lalit Patil) हे प्रकरण तरुणांची पिढी बरबाद करणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने भूमिका घेऊन तरुणांसाठी रस्त्यावर उतरले आहे. विद्यार्थ्यांसाठीच हा मोर्चा असून या तरुणांना वाचवण्यासाठी मोर्चा आहे. नाशिकमधील या प्रकरणात कोण कोण आहे हे स्पष्ट आहे.  तसेच येथील आमदारांना 15 लाख रुपये हफ्ता मिळत असल्याचा गंभीर टीकाही यावेळी केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोर्चा असताना शिक्षणमंत्री मोर्चात विद्यार्थ्यांना सहभागी होवू देत नाही, याचा अर्थ शिक्षण विभागापर्यंत हफ्ता जातो, असेही ते म्हणाले. तसेच मालेगांवला कुत्ता गोली मिळते. इथला पालकमंत्री कुत्तागोळी खाऊन बसला आहे का? असा सवाल करत मालेगांवमधून ड्रग्स रॅकेट कोणाचे मूल चालवतात? नांदगावमध्ये कोणाला हफ्ता मिळतो हे तपासा, असंही संजय राऊत यांनी सांगत दोन्ही आमदारांवर टीका केली आहे. 

उद्या नाशिक बंद करावे लागेल तरी चालेल.... 

उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की, नाशिक ड्रग्सच्या मुळापर्यंत जायचे आहे. नाशिक हे साधा नाही आहे. आमचा आत्मा आहे, आमचा देव, आमचा धर्म इथे आहे. हा कोट्यवधींचा व्यापार इथे नाशिकमध्ये चालला आहे. वेळ आली वेळ आलीय या सर्वांना रामकुंडात बुडवा नाही तर तुडवा,  माझं आव्हान आहे या सरकारला   घेताय अंगावर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहोत, काय करणार आहात तुम्ही आम्हाला, धमक्या देत आहात, अटक करण्याची भाषा करताय, अटक करा, तुरुंगात टाका, एकदा जेलमध्ये जाऊन आलोय, परत जाईल या महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी शिवसैनिकांना धमक्या देऊ नका, नाशिक ड्रग्जमुक्त केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आज रस्त्यावर उतरलो आहे, उद्या नाशिक बंद करावे लागेल तरी चालेल. तुमच्या  मंत्र्यांचा गाड्या रस्त्यावर फिरु देणारं नाहीत

इतर महत्वाची बातमी : 

Nashik News : 'उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गॅंग ड्रग्जवाल्यांना पाठीशी घालतेय', आमदार देवयानी फरांदे यांचा गंभीर आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget