नाशिक : देशभरात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खानचे प्रचंड चाहते आहेत. हे चाहते कधी काय करतील याचा नेम नसतो. त्यातच मालेगावचे (Malegoan) चाहते काही औरच आहेत. प्रत्येक सिनेमा रिलीज झाल्यानंतर थेट सिनेमागृहात फटाके फोडून हल्लडबाजी केली जाते. आता अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) टायगर थ्री चित्रपटाचा शो सुरु असताना अचानक काही सलमान खान प्रेमींनी चक्क थिएटरमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. 


सलमान खानचा टायगर थ्री देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रचंड प्रतिसाद या चित्रपटाला लाभत आहे. सलमान खानचा चित्रपट आला की चाहते सिनेमागृहात गर्दी करत असतात. कधी कधी या चाहत्यांना आवरणं सुद्धा कठीण होऊन बसतं. त्यात मालेगावचे चाहते असतील तर विचार करायची सोय नाही. सलमान खानचा टायगर थ्री सिनेमा (Tiger 3 movie) रिलीज झाला आहे. मालेगावमध्ये (malegaon) शो सुरू असताना सलमानच्या एंट्रीवर चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये फटाके फोडले. हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मालेगावातील मोहन सिनेमागृहात हा प्रकार घडला आहे. थेट थिएटरमध्ये फटाके फोडत हुल्लडबाजी करण्यात आली आहे.   चित्रपटामधील सलमानच्या एंट्रीवर फटाके फोडण्यात आले. 


नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा सिनेमागृहात फटाके आणि आतषबाजी करण्याचा प्रकार घडला आहे. मोहन थिएटरमध्ये सुरू असलेल्या सलमान खानच्या 'टायगर थ्री' चित्रपटाच्या शेवटच्या शो वेळी हा प्रकार घडला आहे. सलमान खानच्या हुल्लडबाज चाहत्यांनी चक्क चित्रपटगृहातच जोरदार फाटके फोडून आतशबाजी केली. या प्रकारामुळे सिनेमागृहात उपस्थित इतर प्रेक्षकांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मालेगावमध्ये चित्रपट गृहात फटाके फोडण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने या हुल्लडबाज चाहत्यांना आळा घालण्याची मागणी होत आहे. सलमान, शाहरुख, अमीरखान (Ameer Khan) या तिन्ही खान मंडळींचे चाहते नेहमीच फटाक्यांची आतषबाजी करत हुल्लडबाजी करतात. पोलिसांनी अशा चाहत्यांना आळा घालावा अशी मागणी थिएटर्स मालकाकडून होत आहे. यापूर्वी असे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत...



जवानच्यावेळी देखील आतिषबाजी 


काही दिवसांपूर्वी आलेल्या अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) जवान चित्रपटाने ताबडतोड कमाई केली. याच जवानचा शो मालेगावात (Malegaon) सुरु असताना हुल्लडबाज चाहत्यांनी फटाके फोडल्याचा प्रकार घडला आहोत. जेव्हा जेव्हा शाहरुख खान, सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकतो. तेव्हा-तेव्हा चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याचबरोबर अभिनेत्यांच्या एंट्रीवर फटाके फोडले जातात. हा प्रकार गेल्या 30 वर्षांपासून सर्रास सुरु असून पोलिसांकडून यांच्यावर कारवाई होते, मात्र पुन्हा चित्रपट लागला की असा प्रकार होतो. एकीकडे सार्वजनिक ठिकाणी आणि सिनेमागृहात चित्रपटगृहात ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असताना अशा प्रकारे क्रेझी फॅन्सकडून सर्रास फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Tiger 3 Review: सलमानचा दिवाळी धमाका, पण शाहरुख खान आहे चित्रपटाचा जीव, इमरानचाही जबरदस्त अभिनय, वाचा टायगर-3 चा रिव्ह्यू