नाशिक : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान चित्रपटाने (Jawan Movie) यंदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अजूनही जवान (Jawan Movie) चित्रपटाचे शोज सुरु आहेत. त्यातच मालेगाव शहरात किंग खानचा प्रचंड चाहता वर्ग असून काल सायंकाळी जवानचा शो सुरु असताना अचानक काही शाहरुख प्रेमींनी चक्क थिएटरमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. यानंतर पोलिसांनी सदर चाहत्यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


शाहरुख खानच्या चाहत्यांचा पराक्रम


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अजूनही राज्यासह देशभरात जवान पाहिला जात आहे. नाशिकमधील मालेगाव (malegaon) शहरात शाहरुख खानचे प्रचंड चाहते आहेत. दरम्यान शहरातील कमलदीप चित्रपटगृहात शाहरुख खान याचा 'जवान' चित्रपट सुरु असतांना त्याच्या चाहत्यांनी थेट चित्रपटगृहात फटाके फोडल्याची घटना काल रात्री घडली. फटाके फोडण्याचा हा व्हिडीओ आज सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे अचानक झालेल्या फटाक्यांच्या अतिशबाजीमुळे इतर प्रेक्षकांना धक्काच बसला. त्यामुळे ऐन भरात असताना चित्रपट बंद करावा लागला. फटाके फोडणाऱ्या चाहत्यांचा हा अतिउत्साह त्यांच्या चांगलाच अंगलट आला असून त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.


मालेगावातील सिनेमागृहात फटाके फोडल्याचा प्रकार


हिंदी चित्रपटसृष्टीतील खान अभिनेत्यांच्या अदाकारीची मालेगावात काही वेगळीच छाप आहे. काही तरुण अक्षरशः खान अभिनेत्यांच्या प्रेमाने पछाडलेले आहेत. त्यांचा कुठलाही नवीन चित्रपट आला की, त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. चित्रपटाला सुरुवात झाली की 'खान' अभिनेत्यांच्या एन्ट्रीचे कोण जोरदार स्वागत करतो, याची जणू स्पर्धा सुरू असते आणि त्याची पडद्यावर एन्ट्री होताच काही उत्साही चाहते थेट फटाके फोडून आनंद व्यक्त करीत असतात. गेल्या दहा वर्षांत चित्रपटगृहात 30 हून अधिक वेळा फटाके फोडण्याचा उपद्रव करण्यात आला असून वेळोवेळी या चाहत्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. काल सायंकाळच्या शो दरम्यान अशाच काही चाहत्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. यावेळी तात्काळ पोलिसांना बोलवण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून फटाके, सुतळी बॉम्ब जमा करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 


'हा' प्रकार नवीन नाही... 


दरम्यान, शाहरुख खानच्या चित्रपटाचे अवघ्या जगाला वेड लावलं आहे. जवान चित्रपटाने ताबडतोड कमाई केली असून अजूनही हा चित्रपट हाऊसफुल सुरु आहे.  विशेष म्हणजे मालेगावात शाहरुख खानची प्रचंड क्रेझ आहे. जेव्हा जेव्हा शाहरुख खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकतो. तेव्हा-तेव्हा चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याचबरोबर फटाके फोडण्याची परंपरा गेल्या 30 वर्षांपासून कायम आहे. एकीकडे सार्वजनिक ठिकाणी आणि सिनेमागृहात चित्रपटगृहात ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असताना अशा प्रकारे क्रेझी फॅन्सकडून सर्रास फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. कालही अशाच प्रकारे शो सुरू असताना सुतळी बॉम्ब फोडण्यात आले, चित्रपटगृह प्रेक्षकांनी भरगच्च असताना हा प्रकार झाल्याने संताप व्यक्त होत आहे.  


महत्वाच्या इतर बातम्या : 


Top 10 Hindi Net Of All Time: किंग खानचा जवान, सनीचा गदर-2 की सलमानचा बजरंगी भाईजान, आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता? जाणून घ्या टॉप-10 चित्रपटांची यादी