नाशिक : सध्या नवरात्रोत्सवाची (Navratri 2023) तयारी जोरदार सुरू असून अवघ्या काही दिवसांत नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरुवात होणार आहे. नाशिकच्या मालेगावात (Malegaon) कारखान्यातील देवींच्या मुर्तींवर अखेरचा हात हे मुर्तीकार फिरवणार आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा देवीच्या मुर्तींच्या किंमतींमध्ये तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून पाचशे रुपयांपासून ते 21 हजार रुपयांपर्यंत देवीच्या मुर्तींच्या किमती पहायला मिळत आहेत. यात सर्वाधिक पसंती सप्तशृंगी देवीच्या (Saptshrungi) मुर्तीला मिळत आहे.
गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी घराघरात नवरात्रीच्या दिवसांत लहान मूर्ती बसवल्या जातात. तर अनेक मंडळ देखाव्याबरोबरच देवीच्या विलोभनीय मूर्ती बसवत असतात. यासाठी गेल्या महिनाभरापासून देवीच्या मुर्ती तयार करण्यात येत आहेत. सध्या नाशिकच्या मालेगावमध्ये मुर्तीकारांची देवीच्या मुर्तींवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग सुरू झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा देवीच्या मुर्तीच्या किमंतीमध्ये तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालेगावात अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा देवीच्या मूर्ती तयार करण्यात येत असून नाशिकसह (Nashik) इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) अनेक भागात मुर्ती बनविण्याचे काम सुरु असून देवीच्या मुर्तींवर कारागीर अखेरचा हात फिरवत आहेत. घरगुती देवी मुर्ती तयार झाल्या असून, मोठ्या मुर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या रविवारी नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार असून त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मुर्तीकारांकडून देवीच्या मुर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. मालेगावात अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा देवींच्या मुर्ती तयार करण्यात येत आहेत. नाशिकसह इतर जिल्ह्यातही या मुर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे आता अनेक मंडळांमध्ये तयारीला वेग आला आहे. आगामी पाच सहा दिवसात शेवटचं कामही पूर्ण होणार आहे. साधारण 8 इंचापासून 7 फुटापर्यंत देवी मूर्ती साकारण्यात येत आहेत. तर 500 रुपयांपासून ते 21 हजारपर्यंत दर आहेत. यात सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरनी अशा विविध मुर्ती तयार करण्यात आल्या आहे. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागातही नवरात्रीचा उत्साह
अलीकडे शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली जाते. देखावे उभारण्याबरोबरच दांडिया गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. तसेच यंदा मूर्तिकारांकडून सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहे. सप्तशृंगी देवीच्या मूर्तीस सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ दुर्गा देवीची मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. सध्या दोन, पाच ते पंचवीस हजारांपर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध असून ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवास होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच पूर्वी ग्रामीण भागातील तरूण वर्ग गरबा खेळण्यासाठी शहरी भागांकडे येत होता. परंतु, ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जात असल्याने ठिकठिकाणी गरबा आकर्षण राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :