नाशिक : एकीकडे कांद्याचा प्रश्न (Onion Issue) तिढत असताना आता टोमॅटोचे दरही (Tomato rate) कोसळले आहेत. यामुळे नाशिक (NashiK) जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. याच प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाहन ताफा दिंडोरी-कळवण रस्त्यावर अडविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र काही काळ रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी थेट टोमॅटो कांदे रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक दौऱ्यावर आले असून ओझर विमातळावरून दिंडोरीकडे जात असताना कळवण (Kalwan) दिंडोरी रोडवर त्यांचा ताफा अडविण्यात आला. शेतकऱ्यांनी ताफ्याच्या समोरच टोमॅटो कांदे फेकत अजित पवारांचे लक्ष वेधले. शिवाय शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत, मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कांदा निर्यात शुल्क मागे, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कस, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला.
अजित पवार हे नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर असून त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होत असताना दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिंडोरी मार्गाने वणीच्या दिशेने चालले असताना शेतकरी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. कांदा आणि टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. कांद्याला हमी भाव नाही, टोमॅटो दहा रुपये किलोने विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी जगायचं कस असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यातील काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल असून रस्त्यावरचे टोमॅटो, कांदा बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.
अजित पवार आता कळवणला रवाना
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी नेत्यांचे दौरे होत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्यात दौरा करत आहेत. यात विशेषतः ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे 'शासन आपल्या दारी' सरकारी कार्यक्रमासाठी एकदा नाशिकमध्ये आले होते. मात्र पक्ष कामकाजाच्या दृष्टीने त्यांचा हा पहिला दौरा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि बहुतांश पदाधिकारी दादा गटात सहभागी झाले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने दादांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ते नाशिकमध्ये आले आहेत. दिंडोरी नंतर ते कळवणकडे रवाना झाले आहेत. याच दरम्यान त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केल्याचे पाहायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या :