Kolhapur News : कोल्हापूर  महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ पंचगंगा हॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे प्रशासक यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला. 


यामध्ये 18 वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.1 येथे आमदार जयश्री जाधव यांच्या शुभहस्ते व महाडिक माळ येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.6 येथे भागिरथी महिला मंचच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले प्राथमिक नागरी आरोगय केंद्रामार्फत प्रभात फेरीचे नियेाजन करुन भागामध्ये जनजागृती करण्यात आली.


पंचगंगा हॉस्पिटल येथे डॉ.रुपाली यादव यांनी अभियान विषयी प्रास्ताविक करुन अभियान दरम्यान महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. 


या अभियानातंर्गत मंगळवारी शहरातील 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत आयोजित केलेल्या शिबीरामध्ये 18 वर्षावरील महिला-331, गर्भधारणापूर्व सेवा व कार्यक्रम-45, गरोदर माता-93, असंसर्गजन्य आजार-106 इतक्या महिलांना वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत आरोग्य तपासणी करुन त्यांना आवश्यकतेनुसार औषधे व समुपदेशन करण्यात आले. 


सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे गरोदर मातासाठी 29 सप्टेंबर व 3 ऑक्टोबर 2022 रोजी सोनोग्राफी शिबिराचे नियोजिन करण्यात आले आहे. 28 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोबरपर्यंत 18 वर्षांवरील शहरातील महिला, माता व गरोदर स्त्रिया यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाअतंर्गत आरोग्य तपासणीकरीता नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या