नाशिक : नाशिक-मराठवाडा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्हे असून नाशिकहून (Nashik) जायकवाडीला (Jayakwadi) सोडण्यात येणाऱ्या पाण्याला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नाशिकमधे दुष्काळी परिस्थिती असताना पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून पुढची तारीख मिळते की न्यायालय काही निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 


नाशिक आणि नगर जिल्ह्यातील (Ahmednagar) धरणातून जायकवाडीसाठी 8. 603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा (Marathwada) पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. निणर्य झाल्यापासून नाशिकच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्तींपुुढे याचिका सादर झाली असून मात्र तातडीनं सुनावणीस हायकोर्टाचा नकार देण्यात आला आहे. पुढील आठवड्यात यांचसंदर्भातील अन्य याचिकेसोबत (Petition) सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आले आहे. 


एकीकडे नाशिक जिल्हयात (Nashik District) दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असतांना नाशिककरांचा विचार न करता नाशिकच्या गंगापूर, दारणा धरण समूहातून 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नाशिक आणि नगर भागातील लाभार्थ्यांवर या चुकीच्या निर्णयामुळे अन्याय होईल अशी भूमिका मांडली जात आहे. यावर आमदार देवयानी फरांदे यांनी देखील पाणी सोडण्यास विरोध केला असून विशेष बाब म्हणून जायकवाडीच्या मृत साठयातून जायकवाडी जलाशयात 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी 5.94 पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. गत अनुभव पाहता पाणी सोडल्यावर वहनतूट 40 ते 45 टक्केे येणार आहे. त्यामुळे जायकवाडीत यातील किती पाणी पोहचू शकेल, असा सवालही आ. फरांदे यांनी उपस्थित केला. 


शेतकरी आक्रमक, आंदोलनाची तयारी 


जायकवाडीला पाणी सोडल्यास शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सय्यदपिंप्रीतील शेतकऱ्यांनी फरांदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. पाणीप्रश्नी तुमच्यासोबत असून वेळप्रसंगी रस्त्यावर आंदोलन करण्याचीही तयारी असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. केवळ विरोध न नोंदविता महामंडळाच्या पुराव्यानुसार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून जायकवाडी च्या मृत साठ्यातुन जलाशयात 65 टक्के उपयुक्त पाणीसाठी होण्यासाठी 5.94 टीएमसी पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही केली. मागील अनुभव पाहता पाणी सोडल्यावर वहनतुट 40 ते 45 टक्के येणार आहे. त्यामुळे जायकवाडीत यातील किती पाणी पोहचू शकेल, असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. त्यानुसार नाशिमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Jayakwadi Dam : नगर नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार, 8 ते 9 टीएमसी पाणी सोडलं जाणार