नाशिक : भाजपला (BJP) 272 जागांची आवश्यकता आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीवरून भाजप 200 जागांच्या आतच समाधान मानावे. त्यामुळे नरेंद्र मोदी 2024 ला पंतप्रधान होणार नाहीत, सरकार कोणाचे असेल हे सांगता येणार नाही. मात्र, देशात नवी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि याच नव्या युतीचे सरकार येऊ शकते, असे सूचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. 


आज 13 ऑक्टोबर असून याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी नाशिकच्या (Nashik) येवल्यात धर्मांतराची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर आज येवल्यात होते. यावेळी ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2024 च्या लोकसभेत एक गोष्ट अधोरेखित राहील, पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते नाशिकच्या येवल्यातील जैन पॅलेस या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार कोणाचे येईल हे आज सांगता येणार नाही, मोदींना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचे असेल तर भाजपला 272 जागा जिंकाव्या लागतील, पण  200 चा आकडा ते पार करतील असे दिसत नाहीये..त्यामुळे एक निश्चित आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान राहणार नाहीत. 


88 व्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त येवला, मुक्तिभूमी येथे धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे रोहन करण्यात आले.