मुंबई : राज्य शासनाच्या टोलवर महिनाभरात नागरिकांना अपेक्षित सोयीसुविधा पुरविण्यात येतील. त्याचबरोबर संबंधित टोलवर पुरुष महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येतील, तसेच संबंधित टोलवर (Toll Plaza) नियुक्ती करण्यात आलेल्या ठेकेदारांची पार्श्वभूमी तपासली जाईल, तसेच कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासूनच कामावर घेतले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिले. तसेच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दाखवलेल्या व्हिडिओ क्लिपवर देखील भुसेंकडून (Dada Bhuse) फडणवीस यांची पाठराखण करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून टोलवरून चांगलंच राजकारण पेटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackerya) यांनी दोन दिवस सलग पत्रकार परिषदा घेत हे प्रकरण जनतेसमोर आणले आहे. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक बाबींवर चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे ठेवत सरकारला धारेवर धरले. तर आता शासनाकडून महिनाभरात नागरिकांना सोयीसुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन दादा भुसे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. यावेळी दादा भुसे बोलत होते. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी अपेक्षित आहे. या महिनाभराच्या कालावधीत नागरिकांना टोलवर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
दादा भुसे म्हणाले की, टोलबाबत प्रबोधनात्मक चळवळ उभी केली जाईल. नागरिकांशी सौजन्याने सन्मानाने वागलं पाहिजे, अशा सूचना सर्व टोलवाल्याना दिल्या जातील. जिथे कुठे असा प्रकार झाला असेल तिथे ताबडतोब कारवाई केली जाईल. अनेकदा टोलवर अनुचित प्रकार घडतात,. यावर रोख आणण्यासाठी संबंधित ठेकेदाराची पार्श्वभूमी तपासली जाईल. कामावर ठेवणाऱ्यांची देखील पार्श्वभूमी तपासली जाईल, माहिती घेऊनच कामावर ठेवेल जाईल, असे दादा भुसे म्हणाले. तर याला जोडूनच पार्श्वभूमी तपासली पाहिजे, हे चांगलं काम केले जाईल असे राज ठाकरे म्हणाले. तसेच प्रत्येक टोलवर स्वच्छतागृहे उभारली जातील, असे आश्वासन दादा भुसे यांनी डोळे तर राज ठाकरे म्हणाले की, मनसेकडून काही टोलनाक्यावर स्वच्छतागृहे उभारली जातील, असे म्हणाले.
फडणवीसांची दादा भुसेंकडून पाठराखण
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ दाखवत सर्व ठिकाणी टोल माफी असल्याचं या व्हिडिओतून देवेंद्र फडणवीस सांगत असल्याचं समोर आणलं होतं. यावर बोलताना दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करत या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दादा भुसे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातून नैसर्गिक रित्या हा शब्द आला असेल. त्या व्हिडिओत फडणवीस आणि हे देखील स्पष्टपणे सांगितले आहे की मुंबईतील जे एन्ट्री पॉईंट्स असतील, तसेच मुंबई पुणे हायवे असेल यासाठी समिती नेमलेली आहे. त्यानुसार काही टोलवर दुचाकी चार चाकी वाहनांना टोलमाफी देण्यात आल्याची वस्तूस्थिती असल्याचे दादा भुसे म्हणाले.
प्रबोधन कक्ष तयार करणार
दरम्यान टोलवर सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असणार असल्याने मनुष्यबळ उभे केले जाईल. अनेकदा स्पीडसदंर्भात तक्रारी असतात, त्यासाठी वाहनधारकांची प्रबोधन केले जाईल. यासाठी प्रत्येक टोलवर प्रबोधन कक्ष तयार करण्यात येईल. अनेकदा हेवी वेहिकल, दुचाकी पहिल्या लेनवर येत असतात, अशा वाहनधारकांसाठी देखील प्रबोधन करण्यात येईल. एकूणच अशा सगळ्या सुविधांसाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असून काही मागण्यावर आजपासूनच अंमलबजावणी करणार असल्याचे दादा भुसे म्हणाले.
इतर महत्वाची बातमी :