पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदू देवदेवतांबाबत अश्लील आणि अर्वाच्य भाष्य केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात 31 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सावंत असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र पडवळ यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा बुदमध्ये राहणाऱ्या मित्र सुजित खेडकर याच्या instagram वर शेअर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देव देवतांविषयी बोलताना आणि प्रत्युत्तर देताना खालच्या आणि अश्लील भाषेत वाक्य वापरले. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.


सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात लहानांपासून तर नेत्यांपर्यंत अनेकांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यात अनेकदा नेत्यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकराच्या कमेंट्स येतात आणि या कमेंट्समध्ये शिवीगाळ केली जाते. त्यामुळे आता सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्यांवर किंवा कमेंट्स करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. शिवाय तक्रारीची देखील लवकरात लवकर दखल घेत पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे आता पुण्यात मोदींना शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. पुणे ग्रामीण परिसरात काम करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संबंंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


सोशल मीडियाचा योग्य वापर करा...


सध्या आपल्यातील सगळेच सोशल मीडियाचा वापर सर्रार करतात. त्यात आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टींसंदर्भात पोस्ट करत असतात. सोशल मीडियाने सगळ्यांना व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. मात्र याचमुळे अनेक चुकीच्या गोष्टीदेखील घडताना दिसत आहे. याच सोशल मीडियामुळे सामाजिक तेढदेखील निर्माण होताना दिसत आहे. अनेक नेत्यांच्या समर्थनात किंवा विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. मात्र अशा पोस्ट करणाऱ्यांविरोधात आहा गुन्हे दाखल होताना दिसत आहे. त्यामुळे योग्य वापर करणं गरजेचं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :


Sasoon hospital drug racket : ललित पाटील कसा पळाला?, डॉक्टरांना लक्ष्मीदर्शन घडतंय का? ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर नेमकं काय म्हणाले?