नाशिक : नाशिक (Nashik) शहरात डीजे (DJ) आणि लेझर शोच्या गजरात उत्साही युवांनी नाचत, थिरकत गणपती बाप्पाला निरोप दिला. मात्र, काही तास उलटताच शहरातील अनेक नेत्रतज्ज्ञांकडे नेत्ररुग्ण वाढू लागले असून जवळपास सहा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील विशीतल्या तरुणांची नजर अचानक कमी झाल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले. विसर्जन मिरवणुकीतील (Ganesh Visarjan) लेझर लाइटमुळे तरुणांच्या नेत्रपटलावर रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा आढळल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरात मोठ्या उत्साहात बाप्पाला (Nashik Ganesh Visarjan) निरोप देण्यात आला. तब्बल पाच वर्षानंतर डीजेवरील बंदी उठविल्याने विर्सजन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट ऐकायला मिळाला. त्याचबरोबर लेझर शो देखील होता. मात्र याच लेझर लाईटमुळे (Lesar Light Show) अनेकांना दिसणे कमी झाल्याचा प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. शहरात जवळपास सहा रुग्णांची नोंद नेत्ररोग तज्ज्ञांकडे (Eye Effect) झाल्याचे समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जात असल्याचं म्हंटल होतं आणि नाशिकमध्ये आता तशी उदाहरणच हळू हळू समोर येऊ लागली असून या लेझर लाईट्समुळे (Lesar Light Effect on Eye) नागरिकांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम झाल्याचं नेत्ररोग तज्ज्ञांच्या तपासणीत समोर आल आहे.
नाशिकमध्ये (Nashik) गेल्या तीन दिवसात अशा 6 घटना समोर आल्या असून लेझर लाईट्समुळे रुग्णांच्या नेत्रपटलावर भाजल्या सारख्या जखमा आढळल्या असून डोळ्यात रक्त साठल्याचे दिसून आले आहेत. भर उन्हात भिंगासमोर कागद जसा जळतो तसाच हा प्रकार असल्याचं डॉक्टर सांगतात. अशा घातक लेझरमुळे दृष्टी कायमस्वरूपी देखील जाऊ शकते अशी भिती नाशिक नेत्ररोग तज्ञ असोसिएशनने व्यक्त केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती देखिल सुरू केली आहे. सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असून अशा लेझरवर बंदी आणण्याची मागणीही असोसिएशनने केली आहे. नेत्ररोग तज्ज्ञांनी सखोल अभ्यास केल्यावर लक्षात आले की या स्रीन लेझरची फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती. जे युवक त्या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले. त्यांच्याबाबतच हा प्रकार घडला आहे. प्रशासनाने त्याची दखल घेण्यासाठी वेळीच हा प्रकार थांबवावा अशी मागणी नाशिक नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नजर कमी झाली...
दरम्यान या पार्श्वभूमीवर डॉ. कासलीवाल म्हणाले की, काही रुग्ण जेव्हा आले, तेव्हा त्यांना दिसायला कमी झाल्याचे समोर आले. त्यांना बाह्य स्वरूपाची कुठलीही तक्रार नव्हती. ज्यावेळी तपासणी केली, त्यावेळी निदर्शनास आले की, डोळ्याचा अंतर्गत पडदा म्हणजे रॅटीना असतो, त्या भागात गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचं समोर आलं. नक्की एखाद्या प्रखर उजेडामुळे किंवा उन्हामुळे जळणं होत असतं. त्याच प्रकारे त्यांच्या डोळ्यांना इजा झाल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे डोळ्याच्या मॅक्युला या भागात गंभीर स्वरूपाच्या जखमा आणि रक्तस्राव झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे या रुग्णांची नजर अकस्मात पणे कमी झाल्याचे देखील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. कासलीवाल यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नाशिक शहरात अद्याप पर्यंत सहा रुग्ण आढळून आल्याचे डॉ. कासलीवाल यांनी सांगितल आहे.
लेझर लाईटचा रॅटीनावर परिणाम
अलीकडच्या काळात लेझर शोध जरी बंद झाले असले तरी काही ठिकाणी लेझर द्वारे आकृती तयार केली जाते. आणि या लेझर लाईटचे फ्रिक्वेन्सी असते आणि या फ्रिक्वेन्सी मुळे आपल्याला हे लाईट दिसत असतात. लेझर लाईट तयार झाल्यानंतर आपल्या डोळ्यातील रॅटिनावर पडत असतात. हे लाईट रेटिनावर पडल्यामुळे अनेक रुग्णांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्याचे दिसून आले. ज्या काही रक्तवाहिन्या आहेत. त्या बंद पडून तिथला रक्तपुरवठा हा खंडित झाला. त्यामुळे रुग्णांची नजर ही कमी झाल्याचे दिसून आलं. अनेक रुग्णांना हा प्रकार सायंकाळी झाल्याचं तपासणी समोर आलं. कारण सायंकाळच्या सुमारास लेझरचे एक्सपोजर अधिकाधिक दिसत असल्याने ते थेट डोळ्यांवर परिणाम करत असल्याचे या रुग्णांच्या तपासणीवरून जाणवले. कारण या रुग्णांना दोन ते तीन तासानंतर तर काही रुग्णांना एका दिवसानंतर कमी दिसण्याची समस्या जाणवू लागली.
इतर महत्वाची बातमी :
Laser Lights Side Effects on Eye : लेझर लाईट्स डोळ्यांसाठी का घातक आहेत?