Reason Of Blur Vision : अंधुक दिसणे हे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते, जाणून घ्या काय आहेत नेमकी कारणं
आजकाल जीवनशैली इतकी वाईट होत चालली आहे की डोळ्यांशी संबंधित समस्या वाढत आहेत. लोकांना लहान वयातच अंधुक दिसायला लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांच्या अनेक आजारांमुळे स्पष्टपणे न दिसण्याची समस्या उद्भवू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधीकधी अंधुक दृष्टी इतर गंभीर रोगांमुळे देखील होऊ शकते. स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोममुळे अंधुक दिसण्याची समस्या तरुणांना भेडसावत आहे. उपचार करूनही समस्या कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.
स्क्रीनवर बराच वेळ घालवल्याने दृष्टी अंधुक होते. अनेक वेळा स्क्रीनकडे पाहताना आपण डोळे लहान करतो. त्यामुळे दृष्टी अंधुक होते.
शुगर लेव्हल आटोक्यात न ठेवल्यामुळे डोळ्यांच्या समस्या, विशेषतः अंधुक दृष्टी येऊ शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, ग्लुकोजची पातळी कमी झाल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. मधुमेही रुग्णांना डोळ्यांशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कमी किंवा उच्च रक्तदाब दोन्ही धोकादायक आहे. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचा परिणाम डोळ्यांवरही होऊ शकतो. जर रक्तदाब खूप कमी किंवा जास्त असेल आणि तुम्ही औषधे घेत नसाल तर अंधुक दिसण्याची समस्या असू शकते.
मायग्रेनचा त्रास असलेल्या एक चतुर्थांश लोकांना अंधुक दिसण्याची समस्या असू शकते.
जेव्हा स्ट्रोक येतो तेव्हा अंधुक दृष्टी किंवा दोन्ही डोळ्यांमधून दृष्टी कमी होण्याची समस्या असू शकते. स्ट्रोकमुळे मेंदूच्या त्या भागावर परिणाम होतो जो दृष्टी नियंत्रित करतो. स्ट्रोकमुळे अंधुक दृष्टी किंवा एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जेव्हा एखादी व्यक्ती विश्रांती न घेता दीर्घकाळ एखाद्या गोष्टीकडे सतत पाहते किंवा त्यावर लक्ष केंद्रित करते तेव्हा डोळ्यावर ताण येतो. कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवणाऱ्यांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळू शकते. याला डिजिटल आय स्ट्रेन असेही म्हणतात.
डोळ्यातील ड्रेनेज सिस्टम ब्लॉक झाल्यास काचबिंदू होतो. या अवस्थेत डोळ्याच्या आतील दाब खूप वाढतो ज्यामुळे डोळ्यात लालसरपणा, वेदना आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत.
यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.