नाशिक : ललित पाटील प्रकरणी माजी महापौर विनायक पांडे यांची अखेर गुन्हे शाखेने दहा ते पंधरा मिनिटे बंद दरवाजाआड चौकशी केली. या चौकशीत आपण ललित पाटीलसह आपल्या वाहनावर असलेला चालक परदेशी याच्याशी काही वर्षांपूर्वीच संबंध तोडल्याचे ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे काही अंशी हे प्रकरणाला विराम मिळाला असला तरीही अद्याप ललित पाटील प्रकरणात आणखी काय समोर येत हे पाहावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ललित पाटीलसह त्याचा सहकारी आणि पांडे यांचा वाहनचालक परदेशी यांच्या नावांची चर्चा आहे. परदेशीचे पांडे यांच्याशी असलेल्या कथित संबंधावरून नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांच्याबाबतही चर्चा सुरू झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर पांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ललित पाटीलशी आपला 2016 पासून कोणताही संबंध नाही, असा दावा केला होता. तसेच आपल्या वाहनचालकाची चौकशी झाली असली तरी त्याला दीड ते दोन वर्षांपूर्वीच आपण कामावरून काढून टाकल्याने त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. दरम्यान, याच प्रकरणावरून गुन्हे शाखेने विनायक पांडे यांना चौकशीसाठी बोलावले होते.
दरम्यान, सुमारे दहा ते पंधरा मिनिटे बंद दारात झालेल्या चौकशीत आपण तीच माहिती दिल्याचे विनायक पांडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, माझ्या गाडीवर चालक असलेल्या परदेशीला शुगरचा त्रास झाल्याने त्याला रात्री वाहन चालवणे अवघड झाले होते. तेव्हाच त्याला कामावरून कमी केले होते. त्यामुळे त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं. तो जेव्हा माझ्याकडे कार्यरत होता, तेव्हा दुपारच्या वेळेस त्याला जेवणाची सुट्टी असायची, माझ्याकडे नसताना तो बाहेर काय उद्योग करतो, याबाबत मला काहीही माहिती नाही. त्यामुळे त्याच्या कृत्याशी माझा काहीही संबंध नसल्याचे मी आधीच स्पष्ट केले आहे, असे पांडे यांनी चौकशी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
काय आहे वाहनचालक प्रकरण?
ड्रग्जमाफिचा संशयित ललित पाटील काही वर्षांपूर्वी वापरत असलेली सफारी कार सिडको खोडेमळा परिसरातील एका गॅरेजमध्ये मागील आठवड्यात आढळून आली होती. पाटीलच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्याने ही कार दुरुस्तीसाठी या गॅरेजमध्ये दिली होती. यावेळी जो चालक ही कार चालवीत होता. त्याची नाशिक पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत फारसे काही तथ्य हाती लागलेले नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. यामुळे संबंधित चालकाचे नाव पोलिसांनी जाहीर केलेले नव्हते. दरम्यान, आता त्याचे नाव आल्यानंतर विनायक पांडे यांनी तो चालक आपल्याकडे असताना दुपारी भोजनासाठी गेल्यानंतर सायंकाळी येत असे आणि रात्री नऊ वाजता ड्यूटी संपल्यानंतर काय करत होता, हे माहिती नसल्याचे सांगितले.
इतर महत्वाची बातमी :